शरीरात रक्ताच्या गाठी होऊ नये यासाठी ‘हा’ सर्वात उत्तम उपाय ! जाणून घ्या काय खावं

पोलिसनामा ऑनलाइन – व्हिटॅमिन के आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं. यामुळं आपलं रक्त घट्ट होत नाही. ब्लड फ्लो सुद्धा योग्य राहतो. यामुळं शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. म्हणजेच ब्लड क्लॉटिंगचा धोकाही रहात नाही. व्हिटॅमिन के कसं मिळवता येईल आणि याचे काय काय फायदे आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत.

कसं काम करतं व्हिटॅमिन K?

शरीरात कुठेही जर जखम झाली तर रक्त वाहायला सुरुवात होते. परंतु काही वेळानं त्यावर रक्ताचा थर जमा होतो आणि रक्त सुकून जातं. रक्तातील प्रोथोम्बिन नावाच्या प्रोटीनमुळं असं होतं. या प्रोटीनची निर्मिती करण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन K ची गरज असते. व्हिटॅमिन K हे शरीरात दोन प्रकारे काम करतं. एक म्हणजे शरीरातील रक्त गोठू देत नाही. दुसरं म्हणजे शरीराबाहेर रक्त वाहू देत नाही.

हाडांसाठी फायदेशीर व्हिटॅमिन K

व्हिटॅमिन K चा रक्तासोबतच हाडांसाठीही खूप फायदा होतो. यामुळं हाडंही मजबूत होतात. हाडांचं मेकॅनिजम ठिक होण्यास याची खूप मदत होते. यामुळं हाडं सॉफ्ट होत नाहीत आणि कमकुवत देखील होत नाहीत. परिणामी फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.

वरदान आहे व्हिटॅमिन K

शरीरात व्हिटॅमिन K ची कमतरता ही काही सामान्य बाब नाहीये. याची खास बात अशी की, खूप रेअर केसमध्ये शरीरात याची कमतरता निर्माण होते. असं झालं तर शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणं वाढतं. यामुळं जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. रक्त पातळ होऊ लागल्यानं जखम झाल्यास किंवा ब्रेम हॅमरेज झाल्यास रक्त अधिक वाहू लागतं.

शरीरात तयार होत नाही व्हिटॅमिन K

शरीराला व्हिटॅमिन K मिळाल्याशिवाय शरीर प्रोथेम्बिनची निर्मिती करू शकत नाही. शरीरातून निघणाऱ्या रक्ताच्या क्लोटींगसाठी हे गरजेचं असतं. यासाठी नियमितपणे हिरव्या भाज्या, दूध, ड्रायफ्रूट्स यांचा आहारात समावेश असावा.

कुणी करू नये वापर ?

ज्यांना रक्त पातळ असण्याची समस्या किंवा आजार असतो त्यांनी रक्त व्हिटॅमिन K भरपूर असणारे पदार्थ खाण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्याकडून हे जाणून घ्यायला हवं की, त्यांनी काय खायला हवं किंवा काय नाही.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.