वडेट्टीवार ‘भूकंप’ घडवतील अन् मग ‘पुनर्वसन’ करतील, मुनगंटीवारांचा ‘खोचक’ टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वडेट्टीवारांकडे भूकंप आणि पुनर्वसन खातं आहे त्यामुळे कदाचित ते भूकंप घडवतील आणि मग पुनर्वसन करतील. असं वक्तव्य भाजप नेते आणि माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार हे नाराज असल्याने ते नॉट रिचेबल आहे. यावरून माध्यमांनी त्यांनी प्रतिक्रिया विचारला असता मुनगंटीवारांनी वडेट्टीवारांवर खोचक निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी इतरही अनेक विषयांवर भाष्य केलं.

माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “ते नाराज आहेत असे मी टीव्हीच्या माध्यामातून ऐकत आहे. मला असं वाटतं की, वडेट्टीवारांकडे भूकंप आणि पुनर्वसन खातं आहे त्यामुळे कदाचित ते भूकंप घडवतील आणि मग पुनर्वसन करतील.” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांच्या बी 1 या सरकारी बंगल्याची दारं खिडक्या बंद आहेत. दुय्यम खाती मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असून ते नॉट रिचेबल आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/