युवासेनेच्या वतीने चीनचा राष्ट्रध्वज जाळून जाहीर निषेध

वाघोली  : प्रतिनिधी(कल्याण साबळे पाटील)  –   भारतीय सीमेवर चीन ने घुसखोरी करून सैनिकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ वाघोली येथे छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौकात शिवसेना युवासेनेच्या वतीने चीनचा राष्ट्रध्वज जाळून जाहीर निषेध व्यक्त करून चिनी मालावर बहिष्कार टाकून भारतीय वीरमरण आलेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली, तसेच शिवसेना चोपनव्या वर्धापनदिनाचा निमित्ताने जेष्ठ शिवसैनिकाचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी पुणे जिल्हा सल्लागार राजेन्द्र भाऊ पायगुडे, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल सातव पाटील,वाहतुकसेना उपजिल्हा प्रमुख राजेन्द्र तांबे,विभाग प्रमुख प्रविण कांबळे, वाघोली शहर प्रमुख युवासेना ओंकार तुपे,गणेश पवार, ओंकार पायगुडे, शुभम सातव,आदिनाथ सातव, बाळासाहेब सातव ,रोहिदास भाडळे,अक्षय गवारी,सुजल सोनावणे आदी शिवसैनिक, युवासैनिक यावेळी उपस्थित होते.