मुंबईच्या कांदिवलीमधील घराची भिंत कोसळली, NDRF च्या जवानांनी 14 जणांना सुरक्षित बाहेर काढलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कांदिवली पश्चिम येथील दलजी पाडा भागात एक तीन मजली घराची भिंत कोसळल्याने 14 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. या सर्वांना रेस्क्यु करून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना रविवारी (दि.10) सकाळी सहाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दबलेल्या ढिगाऱ्या खालून 14 जणांची सुटका केली.

आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दलजी पाडा परिसरातील ही तीन मजली इमारत आहे. दीपज्योति चाळीची भिंत पहाटे सहाच्या सुमारास अचानक कोसळली. काही स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घरातली लोक झोपलेले होते. भिंत कोसळल्याने ते आतमध्ये आडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीच्या वरच्या भागात अडकलेल्या सात जणांना अग्निशमक दलाच्या जवानांनी ग्रील कापून सुखरुप बाहेर काढले. याशिवाय इतर आणखी सात जणांना शिडीच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहिती आहे.
कांदिवली भागात अशा प्रकारे दाटीवाटीत झोपडपट्ट्या उभारलेल्या आहेत. दुर्घटना झालेल्या घरात राहत कुटुंब राहात होती. ढीगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दुर्घटना भागातील घरे हे 40 फूटी उंचीचे आहेत. त्यामुळे या भागात अशा प्रकरे दुर्घटना झाल्यास नागरिकांच्या जीवावर बेतू शकते.