भाजप – राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं का ? रावसाहेब दानवे म्हणाले…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. परंतू राष्ट्रवादीच्या अजित पवारांबरोबर कसं काय जुळलं असे विचारल्यावर त्यांनी पहिल्यांदा प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. परंतू राऊतांवर दानवेंनी तोंडसुख घेतले. राज्यपालांनी काय करावं हे राऊतांनी सांगू नये, शिवसेना अजून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण यावर ठाम नाहीत. राष्ट्रवादीने निवडलेल्या गटनेत्याबरोबर भाजपने सत्ता स्थापन केली तर काँग्रेसने अजूनही गटनेताच निवडला नाही. राज्यपाल अशा परिस्थिती काय निर्णय घेणार? काँग्रेसने विधीमंडळ गटनेतेपद अजूनही कोणाला दिले नाही, कुणाला निमंत्रण देणार असा सवाल दानवेंनी उपस्थित केला.

अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना गौप्यस्फोट केला यावर प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, असं सगळं काही तुम्हाला सांगता येणार नाही. अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना भाजपसोबत जायचं असे आधीच ठरलं होतं असे सांगितले होते.

राज्यात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट आहे. शेतकरी दुखात आहे, अशात तिन्हीपक्षाचे आमदार मुंबईत पाहुणचार घेत आहेत. भाजपचे आमदार मतदार संघात फिरत आहेत. तर राष्ट्रवादी, शिवसेनेचे आमदार फाइव्ह स्टार, सेव्हन स्टारमध्ये पाहुणचार घेत आहेत, एका हॉटेलमधून दुसरीकडे त्यांना का हलवण्यात येत कळत नाही. दानवेंनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अयोध्या राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला. राज्यपालांच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतू प्रत्यक्षात शिवसेनेने अजूनही स्वत:चा वकील नेमला नाही.

काँग्रेस नेते कपिल सिब्बल शिवसेनेची न्यायालयात बाजू मांडतात. हेच सिब्बल अयोध्येच्या राम मंदिरा खटल्याच्या वेळी – राम काल्पनिक आहे. वास्तव नाही असे म्हणले होते. संजय राऊत यांनी 2014 साली कपिल सिब्बलच्या विरोधा लेख लिहिला होता. त्यात त्यांच्यावर अत्यंत वाईट टीका करण्यात आली होती आणि आता हेच सिब्बल शिवसेनेची वकील आहेत. काँग्रेसची हे वकील त्यांना चालतात आणि ते काँग्रेस बरोबर घरोबा करतात. त्यांचीच मदत आता शिवसेना घेत आहे.

Visit : Policenama.com