पोलीसनामा ऑनलाइन – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नरला बॉलिवूडच्या गाण्यांचे वेड आहे. नुकताच कतरिना कैफच्या ‘शीला की जवानी’ गाण्यावर त्याचा डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये तो एकटा नाचत नव्हता, तर त्याच्यासोबत त्याची गोंडस लेकही डान्स करताना दिसली होती. पण आता डेव्हिड वॉर्नरचा सहकुटुंब, सहपरिवार डान्स व्हिडीओ फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे.
वॉर्नरने एक झकास व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत त्याची मुलगी, बाळ, तो स्वत: आणि वॉर्नरची पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करताना दिसत आहेत. डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच टिकटॉक अकाऊंट सुरु केले आहे. आपले व्हिडीओ सध्या तो तिथे पोस्ट करत आहे. तेथेच त्याने आपला सहकुटुंब डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि तो व्हिड़ीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका झकासपैकी म्यूझीकवर त्यांचा डान्स सुरू आहे. हा व्हिडीओ फॅन्सच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. डेव्हिड आणि त्याची लेक दोन दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसले. डेव्हिड वॉर्नरने तो व्हिडीओ देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता आणि त्या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.