Water Intake | पाणी न पिल्याने होईल ही गंभीर समस्या, 1 दिवसात किती ‘वॉटर इन्टेक’ आवश्यक, एक्सपर्टकडून जाणून घ्या फायदे-तोटे

नवी दिल्ली : Water Intake | फोर्टिस हॉस्पिटल कल्याणच्या क्लिनिकल डायटीशियन लक्ष्मी मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शरीरासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही पाण्याचे सेवन केले नाही तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो (Disadvantages Of Not Drinking Water).

दिवसभर चांगले खात असाल, पण पाण्याचे सेवन पुरेसे नसेल, तर पचनावर परिणाम होतो. अ‍ॅसिडिटी, मळमळीची समस्या होते. हे टाळण्यासाठी दररोज प्रत्येकाने वजन, वयानुसार पाणी पिणे आवश्यक आहे. दररोज ३ लिटर पाणी पिणे पुरेसे असते.

पाणी पाण्याचे फायदे

रोज पुरेसे पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. पाणी डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. शरीरात जे काही विषारी घटक असतात ते लघवीद्वारे बाहेर पडतात. जर पाण्याचे सेवन चांगले असेल तर पचनाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. बद्धकोष्ठता, सूज येणे इत्यादी समस्या होत नाहीत. किडनी व्यवस्थित काम करते. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचेवर चमकही येते.

पाणी कधी प्यावे?

दिवसभरात तीन लिटर पाणी प्यायले पाहिजे, पण सकाळी उठल्यावर सर्वप्रथम पाणी पिणे ही अतिशय आरोग्यदायी सवय आहे. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पोट साफ होते. पोट स्वच्छ ठेवल्यास अनेक आजार टाळता येतात. अन्न खाण्यापूर्वी एक तास आधी पाणी प्या. पण जेवल्यानंतर जास्त प्रमाणात पाणी पिणे योग्य नाही.

जेवताना तुम्ही फक्त एक किंवा दोन घोट पाणी पिऊ शकता.
जेवताना जास्त पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पचनक्रिया मंद होते. व्यायामानंतर भरपूर पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर