शेन वॉटसनला मिळाली मोठी ‘जबाबदारी’, माजी अष्टपैलूच्या पदावर ‘विराजमान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याची ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन’ म्हणजेच एसीएच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी रात्री बोर्डाच्या झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली आहे.

38 वर्षीय वॉटसनने या निवडीनंतर ट्विट करून म्हटले कि, या पदावर निवड झाल्यामुळे हि आनंदित असून मला यापुढे देखील खूप काम करायचे आहे. ज्या व्यक्तींनी याआधी या पदावर काम केले आहे त्यांच्यासाठी मला महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. हि संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. वॉटसन याने ऑस्ट्रेलियासाठी 59 कसोटी सामने, 190 एकदिवसीय सामने आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने विविध संघांकडून शानदार कामगिरी केली आहे.

दरम्यान, दहा सदस्यीय बोर्डाचा तो अध्यक्ष असणार असून नुकतेच यामध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू पॅट कमिन्स,क्रिस्टीन बीम्स आणि माजी महिला खेळाडू लिसा स्थळेकर हिचा समावेश करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com