कराची बेकरी आणि कराची स्वीट्सबाबतचं ‘ते’ विधान, संजय राऊत म्हणाले – ‘ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी ‘कराची स्वीटस’ नाव बदलण्याची मागणी केली आहे. यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘कराची स्वीटस’ नाव बदलण्याची मागणी निरर्थक असल्याचं राऊत म्हटलं आहे. त्यामुळे या विषयावर प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे ‘कराची स्वीटस’ विरोधात मनसे ही आक्रमक झाली आहे. पाकिस्तानची राजधानी करायची शहराच्या नावाने मुंबई दुकान चालवण्यास मनसेने आक्षेप घेतला आहे. मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेने मुंबईत कराची स्वीट ‘कराची स्वीटस’ नावाने दुकान सुरू असल्याचे निदर्शनास येताच आक्रमक पावित्रा घेतला आहे.

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची भूमिका

शिवसेना नेते नितीन नांदगावकर ‘कराची स्वीटस’ मध्ये जाऊन दुकानाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. मला कराची शब्दाचा तिरस्कार वाटतो. कारण ते पाकिस्तानातले शहर आहे. मी तुम्हाला काही वेळ देतो तुम्ही दुकानाचं नाव बदला. “आमचे पूर्वज पाकिस्तानात आले होते”, असे उत्तर मालक यानंतर नांदगावकरांनी तुमच्या इथे स्वागतच आहे पण तुम्हाला दुकानाचे नाव बदलावे लागेल तुम्ही हवं तर तुमच्या पूर्वजांचे नाव दुकानाला द्या .

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं ट्विट

कराची बेकरी आणि ‘कराची स्वीटस’ ६० वर्षांपासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी संबंध नाही. निर्वासित सिंधी, पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे.

हाजी शेख यांनी काय म्हटलं आहे पात्रात …

देशाचा पारंपरिक शत्रू देशाची राजधानी ‘कराची’ या नावाचा आधार घेत मुंबईत ‘कराची स्वीटस’ नावाची दुकानं सुरू करून भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेच पोहोचली आहे. ते नाव जोडून व्यवसाय केला जात आहे. तसेच मराठी भाषेचा तिरस्कार केला जात आहे.

दरम्यान, हाजी शेख यांनी याबाबत ‘कराची स्वीटस’ व्यवस्थापकांना कोर्टात खेचणार असल्याचं म्हटलं आहे. दुकानावरील नाव तत्काळ हटवण्याची मागणी करत कायदेशीर नोटीस हैदराबाद येथील ‘कराची स्वीटस व्यवस्थापकांना स्पीड पोस्ट पाठवण्यात आलं आहे.