‘हम तब भी आपके साथ ही रहेंगे’ ! छगन भुजबळांची राज्यपाल कोश्यारी यांना ‘कोपरखळी’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात नाशिकमधील कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे पाहायला मिळाले. राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत येत्या 2 वर्षांत सर्व इमारती बांधा, अशी कोपरखळी छगन भुजबळांनी ((Chhagan Bhujbal) मारली, त्याला लागलीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी उत्तर दिले. त्यावर राज्यपालांनी विचारले, तब तक क्या सिन रहेगा?, भुजबळ म्हणाले, हम तब भी आपके साथ ही रहेंगे या दोघांच्या जुगलबंदीनं व्यासपीठावर एकच हशा पिकला.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर उपस्थित होते.
कोरोना के भय से मत डरो, डटके सामना करो, असा सल्लाही राज्यपालांनी नागरिकांना दिला आहे. भारतीय पुरातन पॅथी, इम्युनिटी वाढविण्यासाठी गुणकारक आहे. याचे संशोधन आणि जनजागृती करावी. सोलर ऊर्जेला मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना, प्रोत्साहन दिले. नरेंद्र मोदी यांनी सोलर ऊर्जानिर्मितीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिल्याचे राज्यपालांनी अधोरेखित केले.