Weather Alert | मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Weather Alert | राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात (Maharashtra, Marathwada, Vidarbha) आज सोमवारी (दि. 28) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची (rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने (weather department) वर्तवला आहे. तर मंगळवारनंतर (दि. 29) राज्यभरात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.28) ते रविवार (दि.4) दरम्यान देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी बहुतेक ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पेरण्यांसाठी जोरदार पावसाची अजूनही प्रतिक्षा आहे. weather alert today monsoon season rain in all over state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनने विश्रांती घेतली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात अद्यापही पेरण्या (Sowing) खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. मात्र पावसाने ब्रेक घेतल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. आणखी काही दिवस पावसाने उघडीप घेतली तर शेतकऱ्यांची भीती वास्तवात उतरू शकते. रविवारी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

पुण्यातही पावसाची हजेरी
पुणे शहर (Pune City) आणि जिल्हा परिसरात रविवारी बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जिल्ह्यात घाटमाथ्यावर सोमवारी (दि. 28) जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. शहरात दुपारी किंवा सायंकाळनंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Web Titel :- weather alert today monsoon season rain in all over state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीता म्हात्रे यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती