अमेरिकेत भारतीय प्रेमी युगुलानं केलं लग्न , कुटुंबातील सदस्यांनी दिला ऑनलाईन ‘आशीर्वाद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने संपूर्ण जग बदलले आहे. लग्न सोहळेही पूर्णपणे बदलले आहे. जिथे हजारो नातेवाईकांच्या उपस्थितीत वर- वधूला आशीर्वाद दिले जात होते, तेथे पाहुण्यांच्या संख्येवर मर्यादा टाकल्या जात आहेत, तर काही जण डिजिटल पद्धतीने लग्न करत आहेत. अशीच काहीशी घटना अमेरिकेतही घडली आहे. तेथे राहणार्‍या एका भारतीय जोडप्याने झूम अ‍ॅपवर लग्न केले. या अनोख्या विवाहात 95 पाहुण्यांसोबत 11 देशांमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांनी भाग घेतला.

यूपीच्या लखीमपूर येथे राहणारे डॉ. अजय आघा आणि डॉ. पूनम आघा यांचा लहान मुलगा अक्षत अमेरिकेत नामांकित कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा विवाह होळीपूर्वी पुण्यातील श्वेताशी करण्याचा निर्णय घेतला होता. जी अमेरिकेच्या टेक्सास शहरात काम करते. लग्न ठरल्यानंतर कोविड – 19 मुळे जगभरात लॉकडाउन झाले. यादरम्यान कोरोना विषाणूचा कहर सुरूच राहिला आणि लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. मग दोघांनीही झूम अ‍ॅपवर निर्णय घेतला कि आता लग्नाची तारीख वाढवणे योग्य नाही. फ्लाइट बंद आहे, कोणीही कोठेही जाऊ शकत नाही. म्हणूनच आता दोघांनीही अमेरिकेत लग्न केले पाहिजे. झूम अॅपच्या माध्यमातून या विवाहसोहळ्यामध्ये दोन्ही कुटुंबातील लोकांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.

अक्षत आगाने न्यायाधीशांना 150 अमेरिकन डॉलर्स देऊन त्याच्या घरी आमंत्रित केले आणि लग्नाचे विधी पूर्ण केले. यावेळी, दोन कुटुंबातील नातेवाईक आणि मित्रांनी झूम अ‍ॅपद्वारे कनेक्ट केले आणि संपूर्ण लग्नाचा आनंद लुटला. वधू आणि वरांना ऑनलाइन शुभेच्छा दिल्या गेल्या. मुलाचे आई-वडील डॉ. अजय आगा आणि डॉ. पूनम आगा यांनी सांगितले की ते या लग्नामुळे खूप आनंदी आहेत. आम्ही आमच्या मुलाचे प्रोफाइल रिलेशनशिप शोधण्याच्या साइटवर ठेवले होते. पुण्यात राहणाऱ्या सिन्हा कुटुंबीयांनी सांगितले की त्यांची मुलगी अमेरिकेतील टेक्सासमध्येही मास्टर्स करत आहे. त्यांनतर दोघेही अमेरिकेत भेटले आणि एकमेकांना पसंत केले, मग लग्न झालं.

या लग्नाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही कुटुंबे आजपर्यंत एकमेकांना भेटलेली नाहीत. केवळ झूम अ‍ॅपवर आणि फोनवर बोलण्याने हे नाते जुळले. आता दोन्ही कुटुंबे एकत्र भेटण्याची वाट पहात आहेत. हे लग्न अमेरिका आणि भारताच्या रीतिरिवाजांने झाले. अमेरिकेत लग्नाच्या वेळी मुला-मुली प्रतिज्ञा घेतल्यानंतर एकमेकांना रिंग घालतात. भारतीय जोडपे होते, म्हणून वरमाला आणि सिंदूरचे विधी झाले, त्यानंतर तीन तास पार्टी चालली.