Weight Loss | वजन कमी करायच आहे? मग ‘या’ पध्दतीने करा; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात लठ्ठपणा (Weight Loss) ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. आपल्याला घरोघरी लठ्ठपणाने त्रस्त झालेले लोक दिसतील. यामागील खरे कारण म्हणजे आजची चुकीची आहार पद्धती आणि वाईट जीवनशैली. लठ्ठपणाच्या (Weight Loss) समस्येमुळे आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवत असतात.

तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

रक्तदाब , मधुमेह , ह्रदयविकार आदी आजारांचा धोका लठ्ठ व्यक्तींमध्ये अधिक असतो. म्हणून लोक आता लठ्ठपणाचे तोटे समजून घेऊन वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर तुम्हाला फिट राहायचे असेल तर वजन कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी दररोज व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणाव दूर ठेवणे, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अनेकजण लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएटिंगचा आधार (The basis of dieting) घेतात. ते डाएटिंगच्या नावाखाली ते पुरेसे अन्नदेखील खात नाहीत. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की, भुकेल्यामुळे पोटाचा लठ्ठपणा वाढतो. कारण, अशा परिस्थितीत शरीरात चरबी जास्त प्रमाणात साठवली जाते. जर आपल्याला खरोखर वजन कमी करायचे असेल तर खाणे पिणे थांबवू नका. त्याऐवजी आपल्या आहाराचे व्यवस्थापन करा. ज्याद्वारे आपले वजन कमी होईल अन् उर्जा देखील मिळेल.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे करा

1. काहीजण खायला बसले की, एकदाच खूप खातात.
मग दिवसभर भूक लागत नाही, तर असे करू नका.
त्याऐवजी दिवसभर थोडे थोडे अन्न खा.
दर दोन तासांनी काहीतरी खाणे सुरु ठेवा.

2. सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास कोमट पाणी प्या.
त्यानंतर थोड्या वेळाने चहाऐवजी ग्रीन टी किंवा लेमन टी प्या.
लेमन टीमध्ये साखरेऐवजी मध वापरा.

केसांसाठी सर्वोत्कृष्ट कीवी हेअर मास्क, प्रत्येक समस्येपासून मुक्तता होईल; जाणून घ्या

3. न्याहरीत अंकुरलेले धान्य, टोफू, सोया दूध, सोयाबीन आणि उकडलेले अंडी अशी उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ घ्या.

4. दर 2 तासांनी एखाद फळ खा. टरबूज, खरबूज, लीची, मोसंबी, संत्रे, सफरचंद, केळी, आलू बुखारा अशी तंतुमय फळे खा.

5. अन्नामधील कार्ब्सचे प्रमाण कमी करा. यासाठी आहारात दोन चपाती, डाळ, भाजी इत्यादी पदार्थ घ्या. भात खाणे टाळा. आहारात दही आणि आठवड्यातून एकदा खिचडी खा.

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या

6. अधिकाधिक द्रव आहार घ्या. दोन तास खाल्ल्यानंतर नारळाचे पाणी, ताक, रस इत्यादी पेय प्या.

7. हलका नाश्ता म्हणून आपण व्हेज सँडविच, पोहा, उपमा, ओट्स कॉर्न आदी घेता येईल.

8. रात्रीच्या जेवणाला, दुधी, तोंडली, घोसाळे इत्यादी पाणीदार भाज्या खा आणि एकावेळी एक किंवा दोनच चपाती खा. रात्रीच्या जेवणाच्या दोन तासांनंतर झोपेच्या वेळी एक नॉन-क्रीम कप दूध घ्या.

हे पण लक्षात असू द्या !

– आहार व्यवस्थापनाव्यतिरिक्त थोडा व्यायाम देखील महत्वाचा आहे. जर रोज व्यायाम करणे शक्य नसल्यास सकाळ अन् संध्याकाळ 30 मिनिटे चाला.

– जंक फूड, फास्ट फूड, शुगरी ड्रिंक पिणे टाळा. कधीकधी काही खाण्याची तलफ आली तर ते घरीच बनवा, तेही कमी तेलात. बटरऐवजी पिनट बटर वापरा.

– आपल्या दररोजच्या आहारात फायबर समृद्ध पदार्थांचा समावेश करा. याने आपली पचनक्रिया सुधारते अन् आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

हे देखील वाचा

LIC New Plan | केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, ‘ही’ योजना तुमच्या मुलाला बनवेल ‘लखपती’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Weight Loss | health tips weight loss tips to manage your weight instead of dieting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update