‘लठ्ठपणा’ दूर आणि कॅन्सरपासून बचाव करते ‘ही’ भाजी, वाढते ‘ताकद’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे लोक आपल्या आहाराकडे फारसे लक्ष देत नाहीत. यामुळे शरीराला पोषकतत्व मिळत नाहीत. म्हणूनच शरीर मजबूत होण्यासाठी अनेकांना आहाराशिवाय फूड सप्लीमेंटवर आवलंबून रहावे लागते. अनेक लोक आयुर्वेदिक औषधांचा वापर करतात. परंतु, एक अशी भाजी आहे, जी सेवन केल्याने काही आठवड्यातच शरीर मजबूत होऊ शकते. एवढेच नव्हे, तर ही भाजी लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. यामुळे अनेक असाध्य रोग दूर राहू शकतात. या भाजीची माहिती आपण घेणार आहोत.

या भाजीचे नाव कंटोळी आहे. या भाजीला काही ठिकाणी चठेल अथवा गोड कारले या नावाने ओळखले जाते. भारतात डोंगरभागात कंटोळीची शेती मोठ्याप्रमाणात होते. परंतु, या भाजीचे आश्चर्यकारक फायदे पाहून आता जगभरात कंटोळीची शेती केली जाते. आयुर्वेदानुसार कंटोळी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक भाजी आहे.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी ही एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. कंटोळीमध्ये मोठ्याप्रमाणात फायबर असल्याने ही भाजी खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे जेवणानंतर काही खाण्याची इच्छा होत नाही. यामध्ये कॅलरी खुप कमी प्रमाणात असतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी ती उपयुक्त आहे.

सर्दी, तापावर गुणकारी
थंडीत सर्दी-ताप होणे ही सामान्य गोष्ट आहे. सध्या थंडीमुळे गारठा वाढल्याने अनेकजण सर्दी-तापाने त्रस्त आहेत. अशावेळी कंटोळीची भाजी खाणे लाभदायक ठरू शकते. कंटोळीमध्ये अँटी अ‍ॅलर्जिक आणि अ‍ॅनाल्जेसिक तत्व असतात, ज्यामुळे सर्दी, ताप आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

बद्धकोष्ठता, अपचनावर उपयोगी
कंटोळीचे नियमित सेवन केल्यास आपली पचनक्रिया सुधारते. अनेक लोकांना या भाजीची चव आवडत नाही, परंतु, ते सुद्धा या भाजीचा वेगळ्या पद्धतीने वापर करू शकतात. जर तुम्हाला कंटोळीची चव आवडत नसेल तर तुम्ही त्याचे लोणचे बनवून खाऊ शकता.

कॅन्सर आणि हृदयरोगावर गुणकारी
कंटोळीमध्ये ल्यूटेनसारखी कॅन्सरविरोधी तत्व असतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर या भाजीच्या सेवनाने हृदयरोगही दूर राहतात. आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात की, आठवड्यातून तीन ते चारवेळा कंटोळीची भाजी सेवन केली पाहिजे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/