काय सांगता ! होय, रेल्वेनं उंदीर मारण्यासाठी केला 1 कोटीहून अधिक खर्च, RTI मध्ये झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उंदीर पकडणे हा रेल्वेसाठी एक मोठा खेळ बनला आहे. नुकत्याच एका माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. आरटीआयला उत्तर देताना असे दिसून आले आहे की रेल्वेने आपल्या आवारात पेस्ट कंट्रोल (उंदीर मारण्याचे औषध) फवारणीसाठी तीन वर्षांत १,५२,४१,६८९ रुपये खर्च केले आहेत. पश्चिम रेल्वे हा भारतीय रेल्वेचा सर्वात छोटा झोन आहे, जो मुख्यत: पश्चिम भारतापासून उत्तर भारताला जोडणारा रेल्वेमार्ग चालवितो. रेल्वे ने आरटीआयला उत्तर देताना म्हटले आहे की तीन वर्षांत १,५२,४१,६८९ रुपये इतके खर्च केले आणि या खर्चातून ५,४५७ उंदीर मारले गेले.

जर याची सरासरी काढली गेली तर रेल्वेने यार्ड आणि रेल्वे कोचमध्ये पेस्ट कंट्रोल फवारणीसाठी दिवसाला १४ हजार रुपये खर्च केले. या प्रचंड खर्चानंतर दररोज केवळ ५ उंदीर मारले गेले.

मारण्यात आलेल्या उंदीरांशी एकूण खर्चाची तुलना करणे अयोग्य : मुख्य जनसंपर्क अधिकारी

मीडिया रिपोर्टनुसार पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंदर भाकर म्हणाले की, असा निष्कर्ष काढणे अयोग्य आहे. ते म्हणाले की मारण्यात आलेल्या उंदीरांच्या एकूण खर्चाची तुलना करणे अन्यायकारक आहे. विशेष म्हणजे आपण यातून काय मिळवले यावर नजर न टाकता यातून काय फायदा झाला हे पाहणे जास्त उचित असते. यातील एक फायदा म्हणजे गेल्या दोन वर्षात पाहिल्यासारखे उंदरांमुळे जे वायरचे कनेक्शन कट व्हायचे आणि सिग्नल फेल व्हायचा आता अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

रेल्वे कोच आणि यार्डमध्ये वायर कुरतडणारे उंदीर आणि विविध कीटकांचा धोका नियंत्रित करण्यासाठी रेल्वे तज्ञ एजन्सीच्या सेवा वापरते. या एजन्सीज रेल्वे रोलिंग स्टॉक, स्टेशन परिसर आणि लगतच्या यार्डात पेस्ट फवारणी करून कीटक व उंदीरपासून होणाऱ्या समस्येवर नियंत्रण ठेवतात. कीटक आणि उंदरांच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळण्यासाठी विविध तंत्रे वापरली जातात, जसे की बॅट, गोंद बोर्ड, काही रसायने आणि जाळे इत्यादींचा वापर केला जातो.

अशा प्रकारे करण्यात येते कीटकनाशक प्रक्रिया

कीटकनाशक फवारणी करण्याच्या उद्देशाने प्रत्येक ट्रेनचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. कीटकनाशकाची फवारणी करण्यापूर्वी ट्रेनच्या प्रत्येक डब्यात सर्वप्रथम ड्राई स्वीपिंग म्हणजेच झाडू मारण्यात येतो. प्रभाव वाढविण्यासाठी निश्चित वेळी केमिकल बदलावे लागते.

पेंट्री कारच्या बाबतीत, प्लॅटफॉर्मवरील संपूर्ण कोच रिकामा केला जातो, तो स्वच्छ केला जातो, कोच मध्ये धूर केला जातो आणि त्यानंतर पेंट्री कार ४८ तासांसाठी सील केली जाते. हे सर्व निश्चित वेळेच्या अंतराने केले जाते.

कीटक आणि उंदरांच्या या नियंत्रण प्रक्रियेमुळे रेल्वे विभागाला त्याचा आतापर्यंत खूप फायदा झाला आहे असे वाटते. रेल्वे विभागाचे म्हणणे आहे की अलिकडच्या वर्षांत कीटक आणि उंदीर यांच्या समस्येमुळे प्रवाशांच्या तक्रारीत घट झाली आहे.

पेस्ट कंट्रोलद्वारे रेल्वेची मालमत्ता बर्‍याच नुकसानीपासून वाचली

याशिवाय रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान होण्यापासून बचाव करण्यात यश आले आहे, जसे की रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग इन्स्टॉलेशन्स, प्रवाशांचे सामान इत्यादींचे नुकसान होण्यापासून टळले आहे. रेल्वेने पेस्ट कंट्रोलद्वारे हे यश संपादन केले आहे. जागोजागी पेस्ट कंट्रोल फवारण्यामुळे उंदीर व कीटक आवारात शिरले नाहीत, म्हणून रेल्वेमार्गावर ठार झालेल्या उंदीरांची नेमकी संख्या उपलब्ध नाही, असा रेल्वेचा विश्वास आहे. प्रवाश्यांना आता मिळालेल्या सोयीची तुलना करण्यासाठी रेल्वेमध्ये ठार झालेल्या उंदीरांची योग्य आकडेवारी उपलब्ध नाही.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/