कॅटरिना कैफला भेटायला जात असताना मीडियाला विकी कौशल ‘बनवतो’, शेजार्‍यांनी केला ‘पर्दाफाश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दीर्घकाळापासून मीडियात बॉलिवूड स्टार कॅटरीना कैफ आणि विकी कौशल यांच्या डेटींगच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. अद्याप दोघांनी एकाही सिनेमात एकत्र काम केलेलं नाही. तरीही चाहत्यांना त्या दोघांना जोडीच्या रुपात पाहण्यााची इच्छा आहे. हेच कारण आहे की, चाहत्यांनी त्यांना मिस्टर अँड मिसेस कौशल म्हणायला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे एकत्र स्पॉट होत आहेत. झी सिने अवॉर्डमध्ये तर कॅट आणि विकी हातात हात घेऊन एकत्र आले होते.

यानंतर चाहत्यांना खात्री झाली की, दोघांमध्ये नक्कीच काही ना काहीतरी शिजत आहे. परंतु त्या दोघांनीही आपल्या डेटींगच्या बातम्या लपवण्याचा प्रयत्न केला आहे हेही तितकंच खरं आहे. दोघांनाही आपल्या नात्याबद्दल बोलायला संकोच वाटतो.

विकी कौशल जेव्हा कधी कॅटच्या घरी जातो तेव्हा तो ओळखू येणार नाही याचीही काळजी घेत असतो. होय हे खरं आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विकी आपली ओळख लपवण्यासाठी हुड किंवा मास्कची मदत घेत असतो. कारण त्याला कोणी ओळखू नये. कॅटच्या शेजाऱ्यांनी विकीला अनेकदा येताना-जाताना पाहिलं आहे.

You might also like