पंकजा मुंडे 12 वाजता काय बोलणार !

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर अस्वस्थ असलेल्या पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर शक्तीप्रदर्शन करत आहेत. परळीतील पराभवाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. पंकजा मुंडे यांचा पराभव केलेले धनंजय मुंडे यांना जायंट किलर म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. खुंटा हलवून बळकट करणे, अशी म्हण आहे. गोपीनाथ गडावरील मेळावा हा त्याचाच प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

ओबीसी समाजाचे नेतृत्व हे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होते. त्यांच्या निधनानंतर ते छगन भुजबळ यांच्याकडे गेले होते. मात्र, ईडीच्या कारवाईमुळे ते जवळपास अडीच वर्षे तुरुंगात होते. त्यामुळे ओबीसीचे नेतृत्व पंकजा मुंडे यांच्याकडे गेल्यासारखे होेते.

परळीतील पराभव आणि पाठोपाठ शिवसेनेने भाजपाला दिलेला धक्का याचा परिणाम भाजपा नेत्यांवरही झाला आहे. पक्षातील लोकांमुळे पराभव झाला असे त्यांचे समर्थक सांगत आहे. सत्ता गेलेली असताना पक्षातील महत्वही कमी होत असल्याचे पंकजा मुंडे यांच्या लक्षात आले. तसेच आता ५ वर्षे राजकारण टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दुसरीकडे छगन भुजबळ हे मंत्री झाल्याने आता ओबीसींचे नेतृत्व आपसुक त्यांच्याकडे जाणार ही आणखी एक खंत पंकजा यांना आहे. तसेच बीडमध्ये आता धनंजय मुंडे यांचे महत्व वाढणार आहे. त्यातून आपले महत्व पक्षात आणि जिल्ह्यात अबाधित ठेवण्यासाठी पंकजा मुंडे यांना काहीतरी करणे आवश्यक होते. तसेच आपल्या समर्थकांना टिकवून ठेवण्याची त्यांना काही तरी करणे गरजेचे होते. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ती संधी त्यांनी साधली आहे.

त्यात आणखी सस्पेन्स निर्माण करण्यासाठी त्यांनी भाजपाचे कमळ काढून टाकले. त्यातून पंकजा मुंडे पक्ष सोडणार इथंपर्यंतची अटकळ न्यूज चॅनेलने लावली. आपल्या मेळाव्याकडे लक्ष जावे, ही पंकजा मुंडे यांचे प्रयत्न होते. ते अशा बातम्यांनी यशस्वी झाले.

त्याचवेळी एकनाथ खडसे हेही मुलीच्या पराभवाने दुखावले गेले आहेत. शिवाय ते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थकही होते. त्यामुळे पराभवाने दुखावलेले दोेघे जण एकत्र आले आहेत.

ओबीसी समाजातील आपल्या समर्थकांना आपल्याकडे कायम ठेवणे. पक्षातील आपले महत्व कमी होऊ नये, तसेच बीडच्या राजकारणात आपले स्थान कायम राहावे, यासाठी पंकजा मुंडे यांचे हे शक्तीप्रदर्शन आहे. एखादी विरोधी गोष्ट झाली की खुंटा हलवून बळकट करणे, अशी म्हण आहे. गोपीनाथ गडावरील मेळावा हा त्याचाच प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/