Coronavirus : ‘कोरोना’ला संपवण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल, जगभरात 4 औषधांचे ‘महा-परिक्षण’ सुरू

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगातिक आरोग्य संघटनेने जगभरातील देशांना म्हटले आहे की, ते मेगाट्रायल करणार आहेत. तुम्हाला हे जाणून आनंद होईल कि ही मेगाट्रायल सुरु देखील झाली आहे. यासाठी WHO ने चार सर्वात प्रभावी औषधांची चाचणी करण्यास सांगितले आहे. या औषधाने आतापर्यंत लोकं कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बरे होत आहेत. जाणून घेऊया ही औषधं कोणती आहेत…

WHO मानते की, या चार औषधां मधील एक किंवा कोणाचे मिश्रण लोकांसाठी वरदान सिद्ध होऊ शकते. हे चार मिळून बनवले जाणारे औषध कोरोना व्हायरसला हरवू शकते. या चार औषधांसह जगभरातील डॉक्टर दोन इतर औषधांवरही लक्ष देत आहेत. या दोन औषधांना सार्स आणि मर्सच्या दरम्यान बनवले गेले होते. पण या औषधांना जागतिक पातळीवर परवानगी मिळाली नाही.

WHO द्वारे सांगितल्या गेलेल्या या चार औषधांमुळे जे लोकं खूप गंभीर आहेत ते बरे होतील. जे आरोग्य कर्मचारी सतत कोरोना रुग्णांचा उपचार करत आहेत, ते सुरक्षित राहतील. सोबतच जे कमी किंवा मध्यम प्रमाणात आजाराने ग्रस्त आहेत ते पूर्णपणे बरे होतील.

पहिल्या औषध रेमडेसिवीर आहे. याला इबोलाच्या उपाचारासाठी बनवले होते. रेमडेसिवीर कोणत्याही व्हायरसच्या RNA ला तोडून टाकते. याने व्हायरस माणसाच्या शरीरात घुसल्यावर नवीन व्हायरस निर्माण करू शकत नाही. अमेरिकेच्या आधी कोरोना व्हायरसच्या रुग्णाला सर्वात पहिले हे औषध दिले गेले होते. तो खूप गंभीर होता. पण दुसऱ्याच दिवशी त्याची तब्येत नीट झाली.

यानंतर दुसरे औषध आहे क्लोरोक्विन आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विन. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते कि हे औषध गेम चेंजर असू शकते. WHO च्या वैज्ञानिक समितीने पहिले या औषधाला फेटाळले होते. १३ मार्च २०२० ला जिनेव्हामध्ये झालेल्या वैज्ञानिक समितीने बैठकीत क्लोरोक्विन आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे महा-परीक्षण पाठविण्याबाबत सांगितले. कारण या औषधाची मागणी जागतिक पातळीवर आली होती. क्लोरोक्विन आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाने माणसाच्या शरीरातील त्या पेशीचा भाग संपवून जातो, ज्यावर व्हायरस हल्ला करू शकतो. याने कोरोना व्हायरसच्या बाह्य भागावर असलेल्या प्रोटीनचे काटे बेकार होऊन जातात आणि व्हायरस कमकुवत होऊन जातो.

तिसरे औषध आहे रिटोनावीर/लोपिनावीर. यांना कॉलेट्रा नावानेही ओळखले जाते. २००० साली याचा वापर अमेरिकेत सर्वात जास्त HIV ला रोखण्यासाठी केला गेला होता. हे औषध शरीरात खूप वेगाने पसरते. सौम्य स्तरावरील संक्रमणासाठी रिटोनावीरचा उपयोग केला जातो, जेव्हा अधिक संक्रमण असले तेव्हा लोपिनावीरचा उपयोग होतो. हे औषध शरीरात व्हायरस असलेल्या ठिकाणी जाऊन व्हायरस आणि माणसाच्या पेशींचे संबंध तोडून टाकते. याची कोरोना व्हायरससाठीची पहिली ट्रायल चीनच्या वुहानमध्येच केली गेली होती. १९९ रुग्णांना प्रत्येक दिवशी दोन वेळा दोन-दोन गोळ्या दिल्या गेल्या. यातील काही रुग्ण मेले. पण औषधाचा परिणाम काही रुग्णांवर दिसून आला होता.

चौथे औषध आहे रिटोनावीर/लोपिनावीर आणि इंटरफेरॉन-बीटाचे मिश्रण. याचा वापर सौदी अरेबियामध्ये मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) महामारीच्या दरम्यान संक्रमित रुग्णांवर केला गेला होता. याने शरीराच्या ऊतक म्हणजे टिश्यूला नुकसान पोहोचते पण व्हायरसचा प्रभाव संपवू लागतो. .

WHO च्या म्हणण्यानुसार अनके देशांनी जसे अमेरिका, युरोपमध्ये फ्रान्स, स्पेन, अर्जेंटिना, इराण, दक्षिण आफ्रिका, चीन, दक्षिण कोरिया, इत्यादी मेगाट्रायलमध्ये गुंतले आहेत. आशा आहे की, या औषधांमधील कोणते तरी एक औषध कोरोना व्हायरसचा उपचार बनून समोर येईल.