बायोपिकमध्ये कोण साकारणार ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगची भूमिका ? खुद्द ‘युवी’नंच केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन :टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटर युवराज सिंग याचं आयुष्य एखाद्या बॉलिवूड सिनेमापेक्षा कमी नाही. त्यानं कॅन्सरसारख्या खतरनाक आजारावर विजय मिळवून क्रिकेटमध्ये वापसी केली होती. युवी खरंच रिअल लाईफ हिरो आहे. त्याच्या बायोपिकमध्ये त्याची भूमिका कोण साकारू शकतो याचा खुलास खुद्द युवीनं केलं आहे. युवीनं त्या अभिनेत्याचं नाव सांगितलं आहे जो त्याची भूमिका साकारण्यास योग्य ठरेल.

View this post on Instagram

#livedareinspire #throwback !

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

भारतीय टीमचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंग यानं सांगितलं की, जर त्याच्या आयुष्यावर एखादा सिनेमा तयार करण्यात आला तर सिद्धांत चतुर्वेदी हा त्याची भूमिका साकारण्यासाठी एकदम सही आहे असं त्यानं सांगितलं आहे.

View this post on Instagram

U will always be my valentine ❤️ @hazelkeechofficial

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

एका मुलाखतीत बोलताना युवी म्हणाला, “तसं तर सिनेमात मुख्य भूमिका कोण साकारणार हे तर डायरेक्टरच निश्चित करत असतो. जर माझ्यावर एखादा सिनेमा बनत असेल तर माझ्या मते सिद्धांत चतुर्वेदी यासाठी उत्तम पर्याय आहे. मला जर याबाबत विचारलं तर मला सिद्धांत चतुर्वेदीला माझ्या भूमिकेत पहायला आवडेल.

2011 मधील आयसीसी वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगला त्याच्या उत्तम सादरीकरणासाठी टूर्नामेंटचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आलं होतं. 2007 मधील टी 20 कपमध्ये त्यानं इंग्लंड विरूद्ध खेळताना सलग 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. हे असं एक वर्ल्ड कप रेकॉर्ड आहे जे आतापर्यंत कोणी तोडू शकलेलं नाही. युवीनं 10 जून 2019 रोजी इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती.

View this post on Instagram

Form is temporary class is forever ! 🏏 ☝🏼

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

View this post on Instagram

Toronto ! #starbucks #memories.

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

You might also like