पंत नाही तर ‘या’ कारणामुळं धोनी भारतीय संघाबाहेर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी याने मागील काही महिन्यांपासून क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. विंडीज दौऱ्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात देखील भारतीय संघात सहभाग घेतला नव्हता. मात्र आता यामागील प्रमुख कारण समोर येत आहे. भारतीय निवड समितीला रिषभ पंत याला योग्य संधी देण्यासाठी धोनी वेळ देत असल्याचे कारण यामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी रिषभ पंत याला निवड समिती जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र काही माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, धोनी पाठदुखीचा दुखण्याने त्रस्त असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो यातून बाहेर येणार आहे. त्यानंतर तो पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. या वर्षी झालेल्या आयपीएलदरम्यान देखील धोनीला पाठदुखीचा त्रास जाणवला होता. वर्ल्डकपनंतर धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे धोनी दोन महिने सुट्टी घेऊन भारतीय सैन्याची सेवा करण्यासाठी जम्मू काश्मीरला देखील गेला होता. मात्र त्यानंतर झालेल्या दौऱ्यात देखील धोनीने सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत धोनी पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्यानंतर बांगलादेशविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

 

Visit : policenama.com