… तर भाजप सरकार बनवण्याचा दावा का करत नाही, शिवसेनेचा BJPला ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने पुन्हा एकदा कालच्या राजकीय घडामोडीनंतर मित्र पक्ष भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेने भाजपला सवाल केली की ते सरकारचा दावा सादर का करत नाहीत. राज्यातील निकाल लागून 15 दिवस झाले परंतू अजूनही सरकार स्थापन झाले नाही. भाजपच्या 105 जागा आहेत आणि 56 जागा शिवसेनेच्या आहेत. परंतू अजूनही शिवसेना आणि भाजपात वाद सुरु आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु आहे. परंतू काल झालेल्या घटनेनंतर आता युती बिनसल्याचे दिसत आहे.

शिवसेनेने आपल्या मुखपत्रात अग्रलेखात लिहिले की गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष नव्हता परंतू सरकार स्थापन करण्यात आले. हे सर्वांना माहित आहे की हे सर्व राज्यपालांच्या सहकार्याने झाले. परंतू महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकून देखील भाजप सरकार बनवण्याचा दावा का सादर करत नाही.

अग्रलेखात लवकरात लवकर सरकार स्थापन करावे असे सांगितले आहे. राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ आजपासून संपत आहे. अग्रलेखात सांगितले आहे की राज्यपाल भाजपला सरकार स्थापनेसाठी बोलवू शकतात कारण त्यांच्याकडे अधिक जागा आहेत आणि भाजपने ही संधी गमावू नये.

सामनातून भाजप शिवसेनेचे सरकार बनवण्यावर टीका करण्यात आली आहे. त्या म्हणले आहे की त्या आश्वसनाचे काय जे युती करताना दिले होते. भाजप कायमच सांगत आहे की समसमान वाटपावर कोणतीही चर्चा झाली नव्हती. मुख्यमंत्रिपद देण्याचा आश्वासनावर देखील शिवसेनेकडून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यात म्हणले आहे की शिवसेनेशिवाय राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नाही परंतू भाजप ते मानण्यास तयार नाही. हे कसे राजकारण आहे. आम्ही अशा खोट्या राजकारणात सहभागी होऊ इच्छित आहे. कालच फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Visit : Policenama.com