दाम दुप्पट ! आगामी 2 – 3 वर्षात चांदीला लाखाची ‘चकाकी’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांदीच्या भावात तेजी येण्याची शक्यता आहे. इतिहास सांगतो की जेव्हा कधी 1 वर्ष चांदीचे भाव चांगलेच वाढले त्यानंतर कमीत कमी दोन वर्ष चांदीच्या भावात तेजी कायम राहिली. चांदी 50 मंथ मूव्हिंग अ‍ॅवरेजच्या रेषेवर कायम आहे.

या आधी 1988 मध्ये चांदीच्या किंमती 50 एमएमएच्या खाली गेल्या होत्या. 1993 मध्ये चांदी त्यावर गेली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमती 4.7 डॉलर होत्या. 1998 मध्ये चांदीने 6.8 डॉलर प्रति औंसचा रेकॉर्ड केला. या दरम्यान 5 वर्षात चांदीने 44 टक्के रिटर्न दिला. 2000 ते 2003 पर्यंत 50 एमएमएपेक्षा खाली होती त्यानंतर 2004 मध्ये 5 डॉलरच्या प्रति औंस गेला. 2008 मध्ये चांदीने 320 टक्क्यांचा रिटर्न दिला त्यानंतर चांदी 21 डॉलर प्रति औंस पर्यंत वाढली.

चांदी 2006 ते 2008 पर्यंत तेजीत होती. परंतू त्याला 2004 साली ब्रेक लागला. 2008 साली चांदी 50 एमएमएच्या खाली आली होती, कारण त्यावेळी जगभरात मंदी होती. शेअर कमोडिटी, रिअल इस्टेट सर्वकाही कोसळले होते.

2009 साली चांदीने परत उचल खालली आणि 12 डॉलर प्रति औंस झाली. तर 2011 मध्ये 49 डॉलर प्रति औंस झाली. दोन वर्षात 308 टक्के परतावा मिळाला. 2013 मध्ये चांदीच्या किंमती 50 एमएमएच्या खाली गेल्या.

साडे सहा वर्षांपासून चांदी 50 एमएमएच्या खाली गेली. चांदी पहिल्यांदा 16 डॉलर प्रति औंसवर ब्रेकआऊट झाली होती. सध्या 17 डॉलर प्रति औंस आहे. चांदीने मागील महिन्यात 12.5 टक्के रिटर्न दिला. यामुळेच चांदीत तेजी कायम आहे. 2 – 3 वर्षात चांदी आणखी महागण्याची शक्यता आहे.