जळगाव : धक्कादायक ! विष प्राशन केल्यानं पत्नीचा मृत्यू तर पतीची Facebook Live करून रेल्वेखाली आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   विष प्राशनाने पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पतीने सुद्धा वसुधा रेल्वेगेटजवळ येऊन घटनेबाबत फेसबुक लाईव्ह केलं. त्यानंतर धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. ही घटना सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी घडली. कांचन प्रमोद शेटे ( वय २८) असे पत्नीचे, तर प्रमोद शेटे ( वय ३२) राहणार कांचन नगर असे पतीचे नाव आहे. मात्र, कांचनची आत्महत्या की हत्या हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद व कांचन हे दाम्पत्य कांचननगरात दोन मुलींसह राहत होते. पती-पत्नीत नेहमीच खटके उडत होते. मंगळवारी सकाळी दोघांत वाद झाला. त्यात कांचन यांनी विष प्राशन केलं, तर प्रमोद हे घरातूनबाहेर पडले. ते असोदा रेल्वेगेटला गेले. तेथे फेसबुक लाईव्ह करून खांब क्रमांक ४२२/२ ते ४२२/४ दरम्यान भुसावळकडून येणाऱ्या धावत्या रेल्वेतखाली आत्महत्या केली. यात प्रमोद यांचा शरीराचे दोन तुकडे झाले. रूळावर ठिक ठिकाणी मांसाचे तुकडे पडले होते. मुंडके असलेले धड व कमरेपासून पाय असलेले धड किमान पाच फुटाच्या अंतरावर होते. याची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिस स्टेशनचे हवालदार मनोज इंद्रेकर, किरण वानखेडे व होमगार्ड विजय पाटील यांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे दोन तुकडे जिल्हा रुग्णालयात आणले. दुसरीकडे कांचन हिला नातेवाईकांनी देवकर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक विठ्ठल ससेयांनीही रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेतली.

ऑडिओ मेसेजद्वारे घटना उघड

घटनेच्या आधी प्रमोद यांनी सकाळी सात वाजता सोबत काम करणारे मित्र ऑडिओ मेसेज केला. काही वेळानी मित्राने हा मेसेज ऐकून प्रमोद त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेला. तिथून प्रमोदची सासू सुरेखा राजेंद्र वाणी, शालक जयेश व मेहुनी प्रियंका हे प्रमोद यांचा घरी गेले. तिथे कांचन मृतावस्थेत होती तर त्यांची दोन्ही लहान मुले गिरिशा व हिरन दोघंही झोपलेली होती. कांचनला मृत पाहून भाऊ बहिणीने हंबरडा फोडला. झोपलेली दोन्ही मुले जागे झाली.

रेल्वे रुळानजीक मद्यप्राशन

प्रमोद यांनी सकाळीच घर सोडून रेल्वे रूळ गाठले. तेथे एका खोलीजवळ मद्यप्राशन केलं. शेवटचा ग्लास भरून ठेवल्यानंतर त्याने ८. ५७ वाजता फेसबुक लाईव्ह केले. त्यानंतर भुसावळकडून येणाऱ्या रेल्वेखालीआत्महत्या केली.

प्रमोद यांचा फेसबुक लाईव्ह संवाद

सर्वात आधी माझ्या आईला नमस्कार… त्यानंतर माझ्या वडिलांना नमस्कार. कारण, ज्यांनी मला जन्म दिला आहे आणि दुसरा नमस्कार माझे जन्म दिल्यानंतर ही ज्यांनी माझा सांभाळ केला ते माझे आजी आजोबा (मा आणि आप्पा) यांना नमस्कार… ज्यांनी माझा जीवनभर साथ निभावण्याची शप्पथ घेतली होती ते आज मरण पावल्यामुळे दोन मिनिट बोलत आहे आणि माझा शेवटचा गुडबाय करीत आहे. याच्या शिवाय मी काहीच बोलू शकत नाही,चेहरा मी दाखवू शकत नाही तुम्हाला. कारण, माझी वाईफ या दुनियेत राहिली नाही. आपल्याला पण राहिला इंटरेस्ट नाही आता ज्यांना मराठी कळत नसेल त्यांना सो सॉरी कारण की मी जन्मापासूनच मराठी आहे.