प्रियकराच्या मदतीने पत्नीनं पतीला संपवलं, प्रायव्हेट पार्टला केली दुखापत

शिवपुरी (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था – अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने दगडाने ठेचून पतीची हत्या केली. एवढेच नव्हे तर मृताच्या प्रायव्हेट पार्टलाही दुखापत करण्यात आली. ही  खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे घडली. मुकेश जाटव असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. या खून प्रकरणाचा 24 तासांत पोलिसांनी छडा लावून 3 आरोपींना अटक केली  आहे.

एसपी राजेशसिंग चंदेल यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मानस भवनमध्ये पोलिसांना एक चेहरा छिन्नविछिन्न झालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आढळले की, मयत  मुकेश जाटव याच्या पत्नीचे कल्लू पठाण नावाच्या व्यक्तीशी अवैध संबंध होते. या दोघांनी पडलेल्या मृतदेहाची ओळख मुकेश जाटव अशी झाली. चौकशीत असे आढळले की त्याच्या पत्नीचे कल्लू पठाण नावाच्या व्यक्तीशी अवैध संबंध होते. या लोकांनी मुकेशला दारू पाजली  आणि दगडाने ठेचून ठार मारले. मृताच्या प्रायव्हेट पार्टलाही दुखापत केली. या खुनात त्याची पत्नी, तिचा प्रियकर आणि आणखी एका आरोपीचा समावेश होता. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली  आहे.

Visit : Policenama.com