NDA च्या बैठकीला शिवसेनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार का ? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता स्थापनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संसदेत सोमवार पासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचे आमंत्रण शिवसेनेला न आल्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी भाजप आपल्या इतर एनडीएतील घटक पक्षासोबत चर्चा करत असते यासाठी सर्व इतर पक्षांना आमंत्रण दिले जाते. अधिवेशनाआधी होणारी ही बैठक अनौपचारिक असली तरी राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाते. गेल्या तीस वर्षांमध्ये शिवसेना नियमितपणे या बैठकीसाठी हजर राहिलेली आहे. मात्र या वेळी अद्याप शिवसेनेला निमंत्रण न आल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे.

भाजपने दिलेला शब्द पाळला नाही यामुळे शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली असल्याचे जरी स्पष्टपणे सांगत नसली तरी मात्र भाजपने शब्द न पाळल्याने अरविंद सावंत यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरु आहे. या तीनही पक्षांमध्ये समान मंत्रिपद वाटण्यात येणार आहेत अशी चर्चा आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद त्यासोबतच राष्ट्रवादीला चौदा महत्वाची खाती तर काँग्रेसला बारा खाती देण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

Visit : Policenama.com