राजीव गांधी वसाहतीत समस्या सोडवू : सुनील कांबळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कासेवाडी येथील राजीव गांधी वसाहतीत (एसआरए) अनेक समस्या आहेत. पाणी, ड्रेनेज लाईन, सतत खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. या परिसरात पदयात्रेसाठी गेले असता सुनील कांबळे यांनी येथील रहिवाशांना सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. रहिवाशांनीही सुनील कांबळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे वचन दिले.

भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांची पदयात्रा बुधवारी चुडामण तालीम परिसर येथून सुरू झाली. ही पदयात्रा हरकानगर, गुरुनाथनगर, महात्मा फुले सोसायटी, कल्याण सोसायटी, शांतीनगर, टिंबर मळा, म्हसोबा मंदिर, राजीव गांधी SRA, मामुजी कॉलनी, कादरी पॅलेस परिसरातून गेली. पेस्टनजी दवाखाना परिसरात या पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
Sunil Kamble
या पदयात्रेला नागरिकांनी उत्साही प्रतिसाद दिला. मुस्लिम बांधवांनी विशेष आपुलकीने स्वागत केले. ही पदयात्रा जसजशी पुढे सरकत होती तसतशी त्यातील लोकांची संख्या वाढत होती. भाजप, महायुती आणि कांबळे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या.

विविध जाती-धर्माच्या नागरिकांचे वास्तव्य असलेल्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना सर्वच समाजातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यांतल्या प्रचारात दलित, मुस्लिम, ओबीसी, मेहतर अशा सर्वच समाजातील नागरिकांनी वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये कांबळे यांच्या पदयात्रेचे उत्साहात स्वागत केले. जागोजागी महिलांनी त्यांचे औक्षण केले. या समाजांतील तरुणांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचाही कांबळे यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

काही वस्त्यांमध्ये फटाके वाजवून, गुलाल उधळून कांबळे यांचे स्वागत करण्यात आले. सर्वधर्मीय नागरिकांच्या श्रद्धेचा मान राखत कांबळे यांनी दर्गा, मंदिर, मशीद अशा धार्मिक स्थळांनाही भेट दिली.

या पदयात्रेत नगरसेविका मनीषा लडकत, अर्चना पाटील, माजी नगरसेवक संदीप लडकत, माजी नगरसेवक सुधीर जानजोत,रफिक शेख, शिवसेनेच्या पद्मा सोरटे, तुषार पाटील आदी उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी