Coronavirus Lockdown : राज्यात 14 एप्रिलपर्यंत वाईन शॉप-परमिट रुम बंदच, मद्य विक्रीस पूर्णपणे ‘बंदी’

पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाग्रस्त  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 220 जणांना कोरोनाची  लागण झाली आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे, त्यानुसार राज्यात  14 एप्रिलपर्यंत मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी 31 मार्चपर्यंत राज्यात मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता ही तारीख 14 एप्रिलपर्यंत करण्याचे ठरविले आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रसाराचे माध्यम पाहता हा एका रुग्णाकडून दुसर्‍या निरोगी व्यक्तीस याचा संसर्ग होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक   आहे. यासाठी 14 एप्रिलपर्यंत सर्व मद्याची दुकाने बंद राहतील. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून मद्य विक्री सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात होती.  मात्र राज्य सरकारने यावर कडक नियमावली केली आहे आणि 14 एप्रिलपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकार लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा विचार करीत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाव्हायरसचे मुंबईत 8, पुण्यात 5, नागपुरात 2, नाशिक आणि कोल्हापुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. शिवाय आणखी काही रुग्णांचे अहवाल मिळाले नसल्याचे सरकारने नमूद केले आहे.