‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या ‘हरॅसमेंट’ला कंटाळून महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला वकिलाने आज (शुक्रवार) न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. रोहित टिळक यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे याच्याकडून होत असलेल्या हरॅसमेंटला कंटाळून महिला वकिलाने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे महिलेच्या वकिलांनी म्हटले आहे. हा प्रकार दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडला.

संबंधीत महिला वकिलावर अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. रोहित टिळक यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे हे करीत आहेत. संतोष सोनवणे हे गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाल कंटाळून महिला वकिलाने आज न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला.

डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांच्या त्रासाला कंटाळून अ‍ॅड. दीप्ती काळे यांनी अनिरुद्ध थत्ते यांच्या सत्र न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना तात्काळ रुबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्या आता अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याचे त्यांचे वकिल अहमद खान पठाण यांनी सांगितले.