धक्कादायक ! सून घरातून पळून गेल्यामुळं सासूनं ‘जीभ’ कापून देवाला केली ‘अर्पण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडच्या जमशेदपूर येथून एक अशी घटना उघडकीस आली आहे जिथे सून पळून गेल्यामुळे एका सासूने आपली जीभ कापून देवाच्या फोटोवर अर्पण केली. सासूचा असा विश्वास आहे की असे केल्याने सून परत येईल. वास्तविक, हे संपूर्ण प्रकरण आरआयटी भागातील एनआयटी कॅम्पसशी संबंधित आहे, येथे एका सासूने आपली सून पळून गेल्यामुळे स्वतःची जीभ कापून भगवान शंकराच्या फोटोवर चढवली. घाईघाईने सासूला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्या महिलेच्या पतीने सांगितले की जेव्हा कोणी गावातून पळून जाते तेव्हा असे मानले जाते की जर कोणी जीभ कापून देवाला अर्पण केली तर पळून गेलेला व्यक्ती परत येतो. त्यामुळे महिलेने आपली जीभ कापली आणि भगवान शंकरांच्या फोटोसमोर अर्पण केली.

रूग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या पतीने सांगितले की, सून शौचास निघाली आणि दीड वर्षाच्या मुलीला घेऊन पळून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीभ कापून अर्पण केल्यामुळे आपली सून लवकरच घरी परत येईल असा विश्वास त्या महिलेला अजूनही आहे.