महिलांनी देखील केली पाहिजे ‘ट्रायसेप्स एक्सरसाइज’, जाणून घ्या कसे करावे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आजच्या युगात पुरुषच नव्हे तर स्त्रियाही ट्रायसेप्स सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. वर्कआउटच्या बाबतीत आज पुरूषांसारख्याच स्त्रियादेखील मेहनत घेत असतात. आजच्या काळात महिला आपले शरीर फिट राहण्यासाठी सर्व प्रकारच्या बॉडी वर्कआउट्स करत आहेत. आपण देखील आपल्या ट्रायसेप्सवर वर्कआउट करू इच्छित असल्यास आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. दररोज केवळ 10 मिनिट ट्रायसेप्ससाठी देण्याची आवश्यकता आहे.

यासाठी डंबेल आणि बॉडीवेट एक्सरसाइजशिवाय इतर काही एक्सरसाइज करणे आवश्यक आहे. यामुळे आपण आपल्या हातांना अधिक सुधारू शकता. आज आम्ही आपल्याला अशाच काही व्यायामाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्या ट्रायसेप्स मध्ये सुधारणा होईल.

ट्रायसेप्स डिप्स (Tricep Dips)

ट्रायसेप्स पुशअपचा वापर हात मजबूत आणि टोन करण्यासाठी केला जातो. हा व्यायाम करण्यासाठी आपल्याला एका बेंचची आवश्यकता असते. आपण हे अगदी सहजपणे करू शकता. ट्रायसेप्स पुशअप करण्यासाठी प्रथम बेंचच्या पुढे जा. आता आपले दोन्ही हात बेंच वर ठेवा आणि खुर्चीवर बसण्याच्या स्थितीत या. या स्थितीतच थांबा. यानंतर कोपर वाकवून आपल्या शरीरास तोपर्यंत खाली ठेवा, जोपर्यंत आपले हात 90 डिग्रीचा कोन बनवत नाहीत. लक्षात ठेवा की या व्यायामामध्ये आपले हात आणि खांदे पूर्णपणे सरळ असावेत.

ट्रायसेप्स किकबॅक (Triceps Kickback)

ट्रायसेप किकबॅक केल्याने हात तसेच मांड्या मजबूत होतात. ट्रायसेप किकबॅक व्यायाम करताना आपण आपल्या उजव्या हातात डंबेल धरा आणि डाव्या हाताने बेंच धरून ठेवा. आता आपल्या डंबेलला आपल्या छातीच्या दोन्ही बाजूला आणण्यासाठी आपले कोपर वाकवा. नंतर श्वास सोडत उजवा हात मागील बाजूस घेऊन जा. नंतर परत छातीवर घेऊन या. ही प्रक्रिया सुमारे 15 वेळा करा. यानंतर हे दुसर्‍या हाताने करा.

बारबेल स्कल क्रशर (Barbell Skull Crusher)

या व्यायामामुळे छाती तसेच हात बळकट होतात. तसेच यामुळे छाती आणि हात मजबूत होऊन त्यांना अधिक चांगला आकार मिळण्यास मदत होते. हा व्यायाम सहजपणे करण्यासाठी आपण आपल्या हाताला मागे एका बेंचवर ठेवा आणि एका हाताने बारबेलला पकडा आणि बेंच वर झोपा. या दरम्यान आपले पाय बेंचवर किंवा बेंचच्या खालील फरशीवर ठेवा. यानंतर आपले हात वाढवा आणि आपल्या छातीच्या सरळ करा. यानंतर आपले खांदे शक्य तितक्या प्रमाणात माथ्याच्या मागील बाजूस आणा. नंतर बारबेलला खाली करण्यासाठी कोपर वाकवा. आता आपल्या स्थितीत परत या. ही प्रक्रिया सुमारे 15 वेळा करा. मग दुसर्‍या हाताने हे करण्याचा प्रयत्न करा.