सावधान ! जर शरीरात दिसतायेत ‘ही’ लक्षणे तर मूत्रपिंड होऊ शकते खराब

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मूत्रपिंड(किडनी) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. शरीराची संपूर्ण यंत्रणा यावर अवलंबून असते. म्हणूनच, जर त्याच्या काळजीमध्ये काही दुर्लक्ष केले तर ते प्राणघातक ठरू शकते. अश्या परिस्थिती अशी काही लक्षणे आहेत, ज्यामुळे आपण जाणून घेऊ शकतो कि, आपले मूत्रपिंड खराब होऊ लागले आहे की नाही?

– किडनी खराब झाल्यावर शरीरात विषाक्त पदार्थ जमा होण्यास सुरवात होते, त्यामुळे हात पाय दुखू लागतात. तसेच युरीनचा रंगही गडद किंवा बदलू लागतो.

– आपल्या पोटातील डाव्या किंवा उजव्या बाजूला असह्य वेदना होत असल्यास, त्यास हलके घेऊ नका, कारण हेदेखील किडनी समस्येचे लक्षण आहे. किडनी कार्य न केल्यामुळे, शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता होते, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन कमी होतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. या रोगात, लघवीचे प्रमाण वाढते किंवा कमी होते. या व्यतिरिक्त वारंवार लघवीची भावना येणे, परंतु गेल्यावर लघवी न येणे हे देखील मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण आहे.

– जर यूरिन दरम्यान रक्तस्त्राव आला तर आपण बेफिकीर राहू नये. आपण त्वरित यूरोलॉजिस्टकडे जायला हवे. जर तुम्हाला अचानक अनेकदा लघवी झाल्यास मूत्रपिंडामध्ये काही प्रकारचे आजार होण्याचे चिन्ह आहे. अशा परिस्थितीत वारंवार लघवी केल्याने मूत्रपिंडाचा कोणताही आजार आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जास्त प्रमाणात लघवी करणे किंवा कमी येणे देखील चांगले मानले जात नाही.

– लघवी करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची जळजळ किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला एकतर मूत्र संसर्ग आहे किंवा आपल्या मूत्रपिंडात एक समस्या आहे. अशा परिस्थितीत आपण एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.