Xiaomi नं लॉन्च केला MIUI 12 चा ‘टीजर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईल क्षेत्रात अग्रेसर असलेल्या Xiaomi ने चीनी माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo वर अपकमिंग MIUI 12 स्किन साठी लोगो पोस्टर जारी केले आहे. या नव्या UI सोबतच MIUI चे 10 वर्षे पूर्ण होणार आहेत. या UI चे पहिले व्हर्जन 2010 मध्ये बाजारात आले होते. त्यानंतर कंपनी आपल्या ग्राहकांकरिता नवनवीन मोबाईल ची रेंज उपलब्ध करून देत आहे.

MIUI 12 मध्ये काय आहे नवीन

*ग्राहकांना अशी आशा आहे कि MIUI 12 मध्ये नवा इंटरफेस उपलब्ध करून दिला गेला असेल.
*Xiaomi ने लॉन्च केलेल्या लोगो पोस्टर मधून असे कळते की MIUI 12 मिनिमलिस्टिक डिझाइन वाला असेल.
*त्याचबरोबर, 12 वर दिलेल्या ग्रेडियंट शेडवरून हे देखील समजू शकते की कंपनी नवीन काही शेड आणि रंग आणू शकते.

मात्र याची किंमत किती असेल, कोणते नवे फीचर्स यात पहायला मिळतील हे मात्र अजून काही स्पष्ट झालेलं नसल्यामुळे त्यासाठी मात्र ग्राहकांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/