काय सांगता ! होय, 409 चेंडूत कोहलीनं केल्या नाबाद 307 धावा

पांडेचरी : पोलीसनामा ऑनलाइन  – हो तुम्ही वाचताय ते बरोबर आहे. कोहली याने ४०९ चेंडुत त्रिशतक फटकावले आहे. कोहलीने नाबाद ३०७ धावा केल्या. हा कोहली विराट नाही तर त्याच्या पावलावर पाऊल टाकून रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरामच्या तरुवर कोहली याने हे त्रिशतक फटकाविले आहे. या त्रिशतकामुळे मिझोरामने अरुणाचल प्रदेशाविरुद्ध तब्बल ९ बाद ६२० धावांचा डोंगर रचला आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या प्लेऑफ ग्रुप सामन्यात अरुणाचल प्रदेशने पहिल्या डावात ३७३ धावा केल्या. त्यानंतर मिझोरामचे ९ बाद ६२० धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात अरुणाचल प्रदेशने ३ बाद १४३ धावा केल्या असून त्यांना डावाने पराभव टाळण्यासाठी अजून १३४ धावा आवश्यक आहेत.

या सामन्यात मिझोरामच्या तीन फलंदाजांनी शतक फटकाविले. अरुणाचल प्रदेशकडून राहुल दलाल याने १७९ चेंडुत १७८ धावा केल्या. मिझोराम संघातील तिसऱ्या क्रमांकावरील तरुवर कोहलीने ४०८ चेंडुमध्ये ३०७ धावा केल्या. त्याशिवाय लालहरएजेला ने १२४ आणि कर्णधार के बी पवन याने १०२ धावा केल्या.
पंजाबमधील जालंधर मध्ये जन्मलेल्या तरुवर कोहली याचे हे पहिलेच त्रिशतक नाही.

त्याने यापूर्वी २०१२ -१३ मध्ये झारखंडच्या विरुद्ध उपान्य फेरीत त्रिशतक केले होते. फलंदाजीबरोबर तरुवर हा वेगवान गोलंदाजीही करतो. तरुवर २०१८ -१९ या सिझनमध्ये मिझोरामकडून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू बनला होता. त्याने ७ सामन्यात ३७३ धावा व ८ बळी घेतले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/