‘इथं’ डायरेक्ट गोळी मिळते : योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकात्यात काल अमित शहा यांच्या रॅलीत झालेल्या राड्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त विधान पुढे आले आहे. काल झालेल्या राड्यानंतर आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोलकात्यात रॅली होती. मात्र त्यांच्या सभामंडपाची तोडफोड करण्यात आली आणि मंडप बांधणाऱ्या कामगारांना देखील मारहाण करण्यात आली.

मात्र, तरीही योगी आदित्यनाथ यांनी रॅली घेतली आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. बंगालमधील बाराहात येथे त्यांनी सभा घेत ममतांवर आगपाखड केली. ममता दीदी एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोटे बोलत आहेत. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले कि ‘टीएमसी’ पश्चिम बंगालमध्ये गुंड टॅक्स वसूल करू शकते, मात्र उत्तर प्रदेशात तसे काही करू शकणार नाहीत. तिथे तसा प्रयत्न जरी केला तरी थेट गोळी मिळेल. बुधवारी दुपारी योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द होणार असल्याचे समजत होते, मात्र त्यांनी सभा रद्द होऊ न देता ती शेवटी घेतलीच. त्यामुळे योगिनीं कालच्या राड्यानंतर ममता सरकारला न जुमानता सभा घेतली आणि कडाडून टीका केली.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर टीएमसी कडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
You might also like