CAA : योगी सरकारची ‘कडक’ कारवाई, समाजकंटकांना नोटीसा, अन् 600 जण अटकेत

लखनऊ : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला उत्तर प्रदेशात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जाळपोळ आणि दगडफेक करून सार्वजनीक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांविरोधात योगी सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी हिंसा घडवून आणणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवून त्यांना नोटीसा पाठवयाला सुरुवात केली आहे. तसेच 600 समाजकंटकांना अटक केली आहे. तर 10 हजार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 19 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान हिंसा घडवून आणणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवण्यात येत आहे. तसेच त्यांना दंड ठोठावण्यात येत असून नोटीसाही पाठविण्यात येत आहेत. दंड न भरणाऱ्या समाजकंटकांची संपत्ती जप्त करण्याबाबतचीही उत्तर प्रदेश सरकारने कार्यवाही सुरु केली आहे. उत्तर प्रदेशात 19 डिसेंबर पासून हिंसक आंदोलन सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवून हिंसा घडविणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे.

दुसरीकडे लखनऊमध्ये झालेल्या हिसेप्रकरणी पकडण्यात आलेल्या अर्धा डझन लोकांचे पश्चिम बंगालसोबत कनेक्शन असल्याचे आढळून आले आहे. या लोकांना पश्चिम बंगालमधून लखनऊमध्ये हिंसा घडवून आणण्यात आले होती. हे सर्वजण पश्चिम बंगालच्या मालदा येथील रहिवासी असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. दरम्यान हिंसा घडवून आणत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दहा हजार समाजकंटकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यात गाझीयाबादमध्ये 3600 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 600 समाजकंटकांना अटक करण्यात आली आहे.

लखनऊचे पोलीस महानिरिक्षक ओम प्रकाश सिंह यांनी सांगितले, उत्तर प्रदेशात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मेरठमध्ये चार, फिरोजाबाद, बिजनौर आणि कानपूरमधील प्रत्येकी दोघांचा आणि संभलमधील एकाचा समावेश आहे. हे सर्वजण क्रॉस फायरिंगमध्ये मारले गेले आहेत. शवविच्छेदन अहवालात या लोकांच्या मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/