तुमची ‘सही’ सांगते तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का ?, जाणून घ्या तज्ञ डॉ. नवनीत मानधनी काय सांगतात याबाबत

पोलीसनामा ऑनलाइन – आजच्या जीवनशैलीमध्ये लोकांना स्वतःसाठीच वेळ नाही. कुठे ना कुठे त्या गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो आणि लोक डिप्रेशनमध्ये जायला लागतात, काही लोकांच्या सहीच्या पॅटर्नवरून हे कळते की ते व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेली आहे किंवा डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे.

काही लोकांच्या सहीमध्ये काही विशिष्ट गोष्टी दिसून येतात, अशी लोकं डिप्रेशनमध्ये आहेत किंवा मानसिक ताणतणावाच्या अशा पातळीवर आहेत की, जिथे तुमच्यावर औषध काम करत नाही.
अशा काही विशिष्ट चुका आहेत, ज्या आपण आपल्या सही करताना टाळल्या पाहिजेत.

* सही करताना सहीचे पहिले अक्षर जर आपण लूपमध्ये म्हणजेच (circle) मध्ये किंवा गोलाकार काढून त्यात लिहिलेलं असेल, तर खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहेत.

* सहीचे पहिले अक्षर सोडून बाकी अक्षरे जर लूपमध्ये किंवा (circle) मध्ये किंवा गोलाकार केलेलं असेल, अशा लोकांना सर्व सुखसुविधा असतात, पण तरीही ती डिप्रेशनमध्ये जायला लागतात आणि त्यातून बाहेर पडता येत नाही.
* पूर्ण सहीच जर तुम्ही एक गोलाकार (circle) मध्ये काढत असाल, तर अशी व्यक्ती, उदासीन वृत्तीची होऊन जाते,अशांना मानसिक पिडा होत असते.

* जर आपल्या सहीमध्ये कुठेही इंग्रजी अक्षरे (‘i’) किंवा (‘j’) येत असेल, तर त्यावरती येणारा डॉट न काढता जर ते गोल (circle) (o) काढत असतील, तर ती (frustration) खूप जास्त मानसिक ताणतणावाची निशाणी आहे.

* कधी कधी आपण (creativity) कलाकृती म्हणून किंवा (style) म्हणून सहीच्या खाली दोन डॉट न देता दोन (circle) किंवा दोन गोलाकार (०) काढतो हेपण मानसिक तणावाखाली असलेल्याचे निर्देश आहेत, हे दर्शवते की एखादी अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आणि तुम्ही मानसिक विकाराकडे वळत आहात.

* जर तुम्ही सहीमध्ये नाव लिहीत असाल आणि त्याची सर्व अक्षरे वेगवेगळी लिहीत असाल (म्हणजे सर्व अक्षरांमध्ये जर अंतर असेल) (isolated) तर हे (isolation) म्हणजेच एकाकीपणा दर्शवते, समाजापासून पण अशी लोकं अलिप्त राहतात, (negative thoughts) नकारात्मक विचार तुम्हाला नेहमी धरून ठेवतील, अशा गोष्टी तुम्हाला डिप्रेशनकडे नेतील.

* जर तुम्ही सही करून सहीमध्ये खूप जास्त काटछाट केली किंवा दोनदा तीनदा खोडली, अशी सही असंतुष्टता दाखवते, तुम्ही तुमच्या कामाने संतुष्ट नसता, तुम्हाला यश मिळत नाही, त्याचा तणाव किंवा तुम्ही तुमचा 100 टक्के लक्ष एखाद्या कामाला देऊ शकत नसाल आणि त्यामुळे होणारा मानसिक त्रास आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जायला लागता.

कधी कधी सही पूर्ण न खोडता, सहीचे फक्त पहिले अक्षर जर तुम्ही खोडत असाल किंवा पहिल्या अक्षरात जर तुम्ही काटछाट करत असाल तर हेसुद्धा डिप्रेशनमध्ये आहे, हे दर्शवते.

* जर सही करताना तुम्ही सहीच्या शेवटचा किंवा कोणत्याही अक्षराची रेष उलट (reverse) जात असेल, तर आणि ते परत सुरुवातीच्या अक्षरापर्यंत जात असेल, तर ते अधोगती दर्शवते किंवा सहीच्या कोणत्याही मधल्या अक्षराची रेष जर उलट (reverse) जाऊन जर पहिल्या अक्षरापर्यंत जात असेल, तर खूप जास्त (frustration) मानसिक ताणतणाव) असल्याचे दाखविते.

अशा चुका आपल्या सहीमधून काढाव्यात. त्यामुळे डिप्रेशनमध्ये गेला असाल, तर परत येण्यास मदत होईल किंवा जर जाण्याची शक्यता असेल तर तीही टाळता येईल.

अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (8605112233)

क्रमशः….