जंगलात असलेल्या धबधब्यावर गेलेल्या तरुणांचा मृत्यु

मुरबाड  : पोलीसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे) –   मुरबाड तालुक्यातील धक्कादायक घटना धबधब्यावर गेलेल्या 6 तरुणानं पैकी 2 जणांचा बुडून मुरबाड मधिल खोपिवली जंगलात असलेल्या चोंडीच्या धबधब्यावर मृत झाले.

गडगे आंबेले येथील 6 तरुण दुपारच्या सुमारास खोपिवली जंगलात असलेल्या चोंडीच्या धबधब्यावरगेले होते अचानक 2 जणांचा तोल गेल्याने धबधब्यात कोसळून मृत झाल्याची घटना घडली दोन तरुण धबधब्यावर बुडल्याची घटना समजताच खोपिवली गावचे नागरिक व सह्याद्री प्रतिष्ठानचे धारकरी घटनास्थळी पोहचून तपास सुरू झाला काही वेळातच मुरबाड पोलीस,अग्निशमनदल ndrf जवानांच्या साह्याने तपासला वेगमिळताचा धबधब्या पासून बऱ्याच अंतरावर एकाचा मृतदेह भेटला असून एकाचा तपास चालू आहे.

लॉक डाऊन दरम्यान शासनाचे नियम पाळत खोपिवली ग्रामपंचायतीने धबधब्यावर जाण्यास कोणासही परवानगी दिली जात नाही जात असल्यास त्याना अडवून धबधब्यावर जाऊन दिले जात नाही असे असतानाही 6 तरुण कोणाच्याही नजरेस न पडता गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

तालुक्यातील गडगे आंबेळे येथील हे सहा तरुण गुरुवारी दुपारी खोपीवली येथील डोंगरातील धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. धबधब्याचा प्रवाह जोरात असल्याने सहा मुलांपैकी दोघे हे प्रवाह सोबत वाहत गेले
असून या मुलांपैकी उमेश बोटकुडले २५ कार्तिक गडगे २५ यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याने एकाचा मृतदेह सापडला असून मुरबाड पोलिसांनी शवविच्छेदन करण्यासाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आणला आहे या बाबत अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

दुसरा मृतदेह शोधण्यासाठी मुरबाड पोलीस, अग्नीक्षमक दल व सहयाद्री प्रतिष्ठान राम भांडे आणि खोपीवली येथील नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित असून उमेश पुंडलिक बोटकुंडले (वय २१) असे मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव असून कार्तिक गडगे (वय २२) याचा शोध सुरू आहे. रात्र झाल्या कारणाने तपास थांबला होता आज पहाटे पुन्हा तपास चालु असून धबधब्याच्या भोवऱ्यात अडकले असल्याचे प्राथमिक माहिती पुढे येतासून बाहेर काढण्या करिता शर्तीचे प्रयत्न चालू आहेत.

लॉक डाऊन दरम्यान संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाळी पर्यटनांवर बंदी आसतांना शासनाचे नियम तोडून देखील पर्यटक तालुक्यातील पर्यटक स्थळावर जातातच कसे असा प्रश्न उद्भवला आहे.