लग्नाच्या आदल्या दिवशी चाकूने भोसकून तरुणाचा खून

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाच्या आदल्या दिवशीच तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. तुमसर तालुक्यातील येरली गावाजवळ हा प्रकार उघडकिस आला आहे. त्याच्या मृतदेहाजवळच चाकू सापडल्याने खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विनोद कुंभारे (वय २६) असे तरुणाचे नाव आहे.

लग्नाच्या मंडपात ठेवावा लागला मृतदेह

विनोद कुंभारे हा येरली गावातील राहणारा आहे. तो आदीवासी कुटुंबातील असून त्याला २३ भाऊ आणि तो चंद्रपूर जिल्ह्यात एका कंपनीत काम करतो. दरम्यान उद्या एकाच मंडपात त्याचे आणि त्याच्या धाकट्या भावाचे लग्न होते. त्यामुळे तो सुट्टी घेऊन गावी आला होता. काल काही कामानिमित्त तो बाहेर गेला आणि परतलाच नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह शेजारी जंगलात मिळून आला. त्यामुळे खळबळ उडाली. त्याच्या मृतदेहाजवळ मोठा चाकू ठेवलेला होता. दरम्यान त्याचा खून का करण्यात आला याचा पोलीस तपास करत आहेत. उद्याच त्याचे लग्न असल्याने त्याच्या घरासमोर मंडप टाकला होता. परंतु याच मंडपात त्याचा मृतदेह ठेवण्याचे दुर्दैव ओढवले आहे.