पब्जी गेम खेळू न दिल्याने युवकाने केले विष प्राशन

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील एका 18 वर्षीय युवकाने पब्जी गेम खेळू न दिल्याने विष प्राशन केले. शनिवारी रात्री ही घटना घडली. त्याच्यावर येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

शहरातील शिंदे मळा परिसरात राहणार्‍या एक युवक एका चायजिनच्या गाड्यावर काम करतो. दिवसभर काम करून रात्रभर तो पब्जी गेम खेळतो. त्याचा हा नाद चायनिज गाडीचा मालक तसेच त्याच्या आईवडीलना खटकत होते. यावरून आईवडीलांनी त्याला खडे बोल सुनावले होते. परंतु तो पूर्णपणे पब्जी खेळाच्या आहारी गेला होता. मालक पब्जी गेम खेळू देत नसल्याने त्याने पब्जीचे दुसरे प्रोफाईल तयार केले होते. व त्यावरुन तो गेम खेळत होता.

शनिवारी तो युवक गेम खेळताना सापडला. ते पाहून गाडी मालकाने त्याला खडसावले. नंतर त्याचा मोबाईल काढून घेतला. गेम सुरू असताना हा प्रकार घडला. या प्रकाराने वैतागलेल्या त्या युवकाने रात्री 10 वाजता आईला फोन करून ‘तू आताच्या आता ये आणि मला मोबाईल दे’, नाहीतर मी ‘मरून जाईन’ असे सांगितले.

नंतर त्याचे आईवडील तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. नंतर पब्जी गेम खेळू देत नाही म्हणून संतापलेल्या त्या युवकाने विष प्राशन केले. अत्यवस्थ अवस्थेत त्याला रविवारी मध्यरात्री शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

You might also like