वांद्रे पूर्वमध्ये झिशान बाबा सिद्दिक्की यांचा विजय

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. या ठिकाणी शिवसेनेच्या तिकिटावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी निवडणूक लढवली होती. तर काँग्रेसच्या तिकिटावर झिशान बाबा सिद्दिक्की यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये झिशान बाबा सिद्दिक्की यांनी 37636 इतक्या मतांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला आहे. दोघांमध्ये झालेल्या तुल्यबळ लढतीत अखेर झिशान बाबा सिद्दिक्की यांनी विजय मिळवला. ५ हजार मतांनी सिद्दिक्की यांनी महाडेश्वर यांचा पराभव केला.

या मतदारसंघात शिवसेनेने आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारत महाडेश्वर यांना तिकीट दिले होते. मात्र त्याचा शिवसेनेला मोठा तोटा होत अखेर काँग्रेसच्या झिशान बाबा सिद्दिक्की यांनी विजय मिळवला. विश्वनाथ महाडेश्वर यांना 32069 मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावरील तृप्ती सावंत यांना 23856 मते मिळाली.

Visit : Policenama.com