भाजपला मोठा धक्का ! 6 पैकी 5 जिल्हा परिषदांमध्ये BJP चा ‘धुव्वा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर त्याचा परिणाम स्थानिक निवडणुकांमध्ये पहायला मिळत आहे. राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज लागले. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार,अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मोजणी झाली. सहापैकी पाच जिल्ह्यात भाजपचा धुव्वा उडाला आहे. विशेष म्हणजे भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये देखील विरोधकांनी एकत्र येत भाजपला धूळ चारली आहे. धुळे जिल्हा परिषदेत मात्र भाजपने एकहाती सत्ता आणली आहे.

नंदुरबार आणि धुळ्याचे निकाल तर विशेष उल्लेखनीय ठरले आहेत. धुळ्यात भाजपाने प्रथमच स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेत भाजपचा केवळ एक सदस्य होता, आता भाजपाने 23 जागांवर झेप घेतली आहे.

सहा जिल्हा परिषदांमध्ये एकूण 332 जागा होत्या. यामध्ये भाजपने 103, काँग्रेस -74, राष्ट्रवादी – 43, शिवसेना – 48 जागा मिळवल्या तर इतर 61 जागी विजयी झाले.

नागपूर जिल्हा परिषद निकाल
एकूण जागा – 58
काँग्रेस – 30, राष्ट्रवादी काँग्रेस – 11, भाजप- 15, शिवसेना – 1, अपक्ष – 1

पालघर जिल्हा परिषद निकाल
एकूण जागा – 57
शिवसेना – 18, माकप – 6, भाजप – 10, राष्ट्रवादी – 15, बविआ – 4, अपक्ष – 3, काँग्रेस -1, मनसे – 0

वाशीम जिल्हा परिषद निकाल
एकूण जागा – 52
राष्ट्रवादी – 12, काँग्रेस – 9, शिवसेना – 6, वंचित बहुजन आघाडी – 8, भाजप – 7, जनविकास आघाडी – 7, अपक्ष – 2, स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1

नंदुरबार जिल्हा परिषद निकाल
एकूण जागा – 56
भाजप – 26, काँग्रेस – 20, राष्ट्रवादी – 3, शिवसेना – 7

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/