विधानसभा : ‘नव्या चेहऱ्यां’मुळे शिवसैनिकांना ‘शिवाजीनगर’ मध्ये धास्ती !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आठही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी तयारी सुरु केली असली तरी बहुतांश इच्छुकांचा कल युतीकडे आहे. त्यातही भाजपकडून ‘तिकीट’ मिळविण्यासाठी काही नवे ‘चेहरे ‘मोर्चेबांधणी करीत आहेत.त्यातही भाजपकडून नाही तर किमान शिवसेनेच्या ‘कोट्या’तून आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे नवे चेहरे सरसावले आहेत, परिणामी इतके वर्षे पक्षाला देऊनही आम्हाला संधी मिळत नसेल तर कुठे दाद मागायची अशी वेळ जुन्या जाणत्यांवर ओढवणार आहे. विशेषतः शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात हे चित्र शिवसेनेत आतापासूनच पाहावयास मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत सहा लाखांची व्होट बँक मिळवणाऱ्या भाजपने आठही मतदारसंघावर यापूर्वीच ‘कब्जा’ मिळवलेला आहे. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणूक जरी शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असली तरी जागावाटपाचा तिढा निर्माण होणार आहे. लोकसभेच्या प्रचारात आम्हाला गृहीत धरले नाही, अशी तक्रार शिवसेनेने केली होती. मात्र आता जागावाटपावरून सेनेला ‘ टाहो ‘ फोडावा लागणार आहे. कुठला बालेकिल्ला आमचा होता, कोणता तुमचा या समीकरणाला भाजपकडून दाद मिळणार नाही, हे स्पष्ट असताना जागावाटपात मित्रपक्षांना जागा द्यावी लागणार आहे. परिणामी कोणते आणि किती मतदारसंघ पदरात पडतात, याचीही खात्री म्हणा अंदाज शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वांना नाही.

त्यातच ‘मातोश्री’वरून या प्रश्न विचारल्याशिवाय लक्ष घालायचे नाही असा फतवा आल्याने सेनेच्या स्थानिक नेतृत्वांची अवस्था बिकट झाली आहे. कोथरूड मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाईल हे जवळपास निश्चित आहे. भाजपचे येथील विद्यमान आमदारांचे कार्य काय हा मुद्दा बाजूला ठेवून हा मतदारसंघ युतीत सेनेला बहाल केला जाईल अशी दाट शक्यता आहे. त्यानुसार येथून सेनेचे दिग्गज इच्छुक असले तरी त्यांना आता ‘ आयाराम’ ची धास्ती आहे. विशेषतःहा मतदारसंघ जर भाजपला नसला तरी युतीत लढताना शिवसेनेकडून हा मतदारसंघ पोषक असल्याने काही नवे चेहरे आतापासून इच्छुक आहेत. एक आयपीएस अधिकारी प्रथम भाजपकडून इच्छुक होते मात्र ते आता शिवसेनेकडून लढण्यास ‘गणित’ जुळवत आहेत. मात्र त्यांनाही ‘कांटे की टक्कर’ देण्यासाठी एका बड्या आसामींचा चिरंजीव आता रिंगणात उतरणार आहे. त्यात त्या घराण्याचे सर्वपक्षीयांशी उत्तम संबंध असून दिल्लीपर्यंत त्यांची मजल आहे.

त्यात समाजाच्या सर्वच स्तरात संपर्कात असणाऱ्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नगरसेवक त्यांच्यासाठी मनापासून काम करण्यास तयार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या जुन्याजाणत्यांना आता स्वतःच्या अस्तित्वाची चिंता भेडसावत आहे. राज्यमंत्री मंडळ विस्तारात कुणाला लाथाडले, कुणाला जवळ केले, याचे दाखले देऊन सेनेत आता अंतर्गत नाराजी वाढत चाललेली आहे. निवृत्त होणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यावर मात करू शकणाऱ्या ‘त्या’ बड्या घराण्यातील उद्योगपती चिरंजीवासाठी सेनेच्या स्थानिक आणि कट्टर असणाऱ्या शिवसैनिकांना अपरिहार्यतेतुतन ‘होकार ‘ द्यावा लागेल अशी स्थिती आहे.


सिनेजगत

‘या’ अभिनेत्याला करायचाय ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीसोबत ‘इंटिमेट’ सीन

काय सांगता ! फेसबुकवर ‘बिकीनी’ फोटो टाकल्याने ‘या’ महिला डॉक्टरचे ‘लायसन्स’ रद्द !

बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

Video : जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

काळवीट शिकार प्रकरण : ‘भाईजान’ सलमानबाबत जोधपूर कोर्टाचा ‘मोठा’ निर्णय

दोन पत्नीसोबत राहतो ‘हा’ मोठा सिंगर, ज्याचे आहेत लाखो ‘फॅन’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…