नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक अकाऊंट किंवा फोन नंबरला आधारशी लिंक करण्याच्या नावाखाली बँक खाते आणि इतर दस्तावेजांच्या माहिती मिळवून वयोवृद्धांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आधार लिंक करण्याच्या नावाखाली 1 हजारांहून अधिक वयोवृद्धांना जवळपास 10 कोटींच्या रकमेची फसवणूक करणाऱ्या टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या टोळीचं जाळं अनेक राज्यात पसरलं आहे. या टोळीचा म्होरक्या झारखंडमधील अलिमुद्दीन अन्सारी आहे. पोलिसांनी अलिमुद्दीन आणि आझमगडच्या मनोज यादवला अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यातील 81 डेबिट कार्ड, 104 चेकबुक, 130 पासबुक, 8 फोन, 31 सिम कार्ड, आयडी प्रूफची फोटोकॉपी इत्यादी सामान जप्त करण्यात आलं आहे.
या टोळीतील मनोज यादव पैशांच्या हिशेब ठेवत असे आणि गरीबांच्या नावे बँकांमध्ये खाते उघडत असे. यासाठी मनोज मजुरी करणाऱ्या मजुरांच्या संपर्कात राही आणि त्यांना प्रत्येक खात्याचे दोन हजार रुपये देई. बँक खाती 1100 रुपयांपासून उघडण्यात आली आहेत. पैसे देऊन तो या लोकांचे आधार, पॅन डिटेल्स घेई. या लोकांसोबत जाऊन आधार कार्डवरचा पत्ता बदलवून घेई आणि या चुकीच्या पत्त्यावर खातं उघडत असेल.
या दरम्यान मनोज स्वत:चा नंबरही बँकेत रजिस्टर करत असे. खात्याचं पासबुक, डेबिट कार्ड, चेक बुक तो आपल्याजवळ ठेवत असे. या खात्यांचा उपयोग ज्यांना फसवायचं त्या लोकांच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करून घेत असे. एकदा एका खात्याचा वापर झाला की पुढचे अनेक महिने ते खातं वापरलं जायचं नाही. पोलिसांनी बँकांमध्ये चौकशी करून कशा प्रकारच्या 1100 खात्यांचा शोध घेतला आहे.
अशी करायची फसवणूक –
आरोपी अलिमुद्दीन अन्सारी वयोवृद्धांना फोन करून बँकेचा कर्मचारी असल्याचं सांगून बँक अकाऊंट किंवा फोन नंबर आधार कार्डला लिंक करून त्यांच्या नावे बँक अकाऊंट, डेबिट कार्ड आणि फोन नंबर, सिम कार्डची माहिती मिळवायचा नंतर तो सिम कार्ड लॉक करण्याचा एक मेसेज पाठवत होता आणि त्याला 121वर फॉरवर्ड करण्यास सांगायचा. त्यामुळे त्या फसवणूक झालेल्या वयोवृद्धांचं सिम कार्ड डिएक्टिवेट व्हायचं. अलिमुद्दीन नवा सिम कार्ड मिळवून त्याद्वारे ओटीपी प्राप्त करत होता.
Visit : Policenama.com
- बाळाला ‘अॅनिमिया’ होऊ नये यासाठी अशी घ्या काळजी, जाणून घ्या उपाय
- मद्य सेवनामुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, आरोग्यासाठी हानिकारक
- ‘स्ट्रेच मार्क’ घालवण्यासाठी ‘हा’ आहे खास उपाय! महिला घरच्याघरी करू शकतात
- चष्मा घालवायचा असेल तर घ्या ‘हे’ पेय, डोळ्यांचे आरोग्य राहील उत्तम!गाजर खा आणि निरोगी रहा, ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे, जाणून घ्या
- शरीरात वेदना होतात का? तर वेदनाशामक गोळीऐवजी करा ‘हे’ घरगुती उपाय
- रोज एक कप ‘कॉफी’ घ्या…आणि वाढता तुमचे आयुष्यमान, जाणून घ्या अन्य फायदे