पथ्रोट ग्रामपंचायतीचा 11 महिन्याचा वनवास संपला ! अखेर ग्रामविकास अधिकारी म्हणून हर्षदा बोंडे नियुक्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम  ( अभिजित पडोळे) –   पथ्रोट ग्रामपंचायत च्या रेंगाळलेल्या विकास कामाची गती पाहुन गावातील लोकांच्या मागणीनुसार हर्षदा बोंडे यांची कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी पथ्रोट येथे नियुक्ती करण्यात आली.अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पथ्रोट ग्रामपंचायत चा उल्लेख होतो. प्रभारी चार्ज म्हणुन पथ्रोट ग्रामपंचायत कारभार योग्य पद्धतीने हाताळुन पाणी टंचाई, विविध विभागांतर्गत गावात विकासाची कामे जिल्हा परिषद शाळेत सगणकाची लॅब लहान मुलांना डेक्स बेंच उपलब्ध करून दिली,खेळण्याचे साहित्य आणुन चौदाव्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचा झंझावात विशेष म्हणजे वर्षानुवर्षे पासून‌‌ असललेली विद्यूत महावितरण. कडे थकबाकी वसुली करणे, जलस्वराज्य योजना अंतर्गत असलेल्या कामाला गती आणुन गावातील लोकांना पाणीटंचाई पासून दिलासा मिळुन देणे अशा अनेक कामामुळे मागील अकरा महिन्यात आपल्या कामाची छाप पाडल्याने गावकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषद ने हर्षदा बोंडे यांचीच कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

काही वर्षांपासून प्रभारी चार्ज म्हणुन ग्रामसेवक पथ्रोट ग्रामपंचायत चा कारभार चालत होता.पण विकासाची कामे रेंगाळत होती त्यामुळे गावात कायमस्वरूपी ग्राम विकास अधिकारी रहावा यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद,प स अचलपूर यांच्या कडे मागणी केली होती त्यानुसार त्यांच्या मागणीनुसार पथ्रोट ग्रामपंचायत ला कायमस्वरूपी कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी मिळाले. पथ्रोट ग्रामपंचायत ला कर्तव्यदक्ष हर्षदा बोंडे च्या रुपाने पहिल्यांदाच एक महिला ग्रामविकास अधिकारी पथ्रोट गावाला लाभल्या. ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे याची कार्यशैली पाहुन गावातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या

हर्षदा बोंडे या रासेगाव ग्रामपंचायत चा कार्यभार सांभाळत असताना विविध विकासकामांच्या जोरावर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम गावातील लोकांचा सहभाग घेऊन ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने स्मार्ट ग्राम हि योजना सुरू केली होती त्यावेळी पहिल्याच वर्षी पहिलाच पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्या मध्ये अचलपूर तालुक्यातील रासेगाव ग्रामपंचायत ला प्रथम क्रमांक मिळुन देण्यात ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांचा सिहाचा वाटा होता हे विशेष.