जादा सेवा देण्यासाठी नालासोपारा आगारात नाशिकहून 20 चालक दाखल, वाढविल्या जादा फेर्‍या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    प्रवाशांनी केलेल्या रास्तारोकोची एसटी महामंडळाने दखल घेतली आहे. नालासोपारा आगारातून 30 ते 40 जादा फेर्‍या वाढविल्या आहेत. हि जादा सेवा देण्यासाठी नाशिकहून 20 चालक दाखल झाले आहेत.

नुकताच नालासोपारा येथे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर नोकरदारांना एसटी बसची सुविधा मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांनी नालासोलारा रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वेरोको केला होता.

नालासोपारा इथल्या नोकरदारांना 22 जुलै रोजी सकाळच्या सुमारास एसटीची सुविधा मिळाली नाही. त्यामुळे प्रवासी थेट नालासोपारा रेल्वे स्थानकात गेले. पोलिसांनी यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, प्रवाशांनी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आणि रेल्वे रुळावर उतरले. साधारणत: 200 जणांनी लोकल काही वेळ थांबवून ठेवली होती

रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी सामान्य प्रवाशांना रेल्वे रुळावरून हटण्यास सांगितले. सध्या केवळ निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल सेवा सुरु आहे. सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही, अशी समज पोलिसांनी प्रवाशांना देण्यात आली. त्यानंतर सर्व प्रवाशांना बाजूला केले. या घटनेनंतर खबरदारी म्हणून एसटीने नालासोलारा आगारातून 120 ते 130 फेर्‍या होत होत्या. तर, आता 30 ते 40 फेर्‍या वाढविल्या आहेत.

नालासोलारा आगारासह इतर आगारातून नालासोलारा येथे सकाळी आणि सायंकाळी चालक -वाहकास जव्हारवरून 4 एसटी बस, भोईसरवरून 10 एसटी बस, पालघरवरून 12 एसटी बस, सफाळेवरून 5 एसटी बसेस येतात. नालासोलारा आगाराला दररोज सुमारे 2 लाख 80 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे.

नालासोलारा आगारामध्ये एकूण 105 चालक आहेत. मात्र, यापैकी केवळ 30 चालक येत आहेत. गैरहजर चालक सातारा, विदर्भ या भागात सध्या अडकले असून त्यांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठीची सोय नाही. परिणामी, एसटीच्या सेवा वाढविण्यासाठी नाशिकहून 20 चालक नालासोलारा येथे दाखल झाले असून ते सेवा देत आहेत.

नालासोपारा आगारातून 120 ते 130 फेर्‍या होत होत्या. आता 150 ते 160 फेर्‍या धावत आहेत. नाशिकहून देखील चालक दाखल झाले असून नालासोलारा आगारातील जे चालक गैरहजर आहेत. त्यांना फोन करून बोलाविण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया नालासोलारा आगार व्यवस्थापक प्रज्ञा सानप-उगले यांनी दिली आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊन काढून अनलॉक जारी केला असला तरी दळणवळाची पुरेशा साधनांनी नोकरदार वर्गाला कामावर ये-जा करावी लागत आहे. तसेच केवळ अत्यावश्यक सेवांसाठी लोकल सेवा सुरू ठेवली आहे. यामुळे अनेकांचे हाल होत आहे. काम केल्याशिवार आर्थिक गणितं कशी सांभळली जाणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मुंबईसह परिसरातील उपनगरात कामगार वर्ग अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे सरकारने लोकसेवा आणि बससेवा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. दळणवळाची साधने नसल्यामुळे काहींना कामावर ये-जा करण्यात अडचणी येत आहे. यातच मर्यादीत लोकल सेवा आणि बससेवा ठेवली तर हमखास गर्दी होणार आहे.

कोरोना विषाणूचे संक्रमण होणार्‍यास याची मदत होणार, असे चित्र आहे. त्यामुळे सरकारने कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी तसेच गर्दी कमी करण्यासाठी लोकल सेवा आणि बससेवा योग्य पध्दतीने सुरू केली पाहिजे, अशीही मागणी होत आहे.