सापाला मारुन ‘मसाला’ लावून खाल्ले, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   एका 30 वर्षाच्या व्यक्तीने सापाला ठार मारले व त्याचे तुकडे करुन मसाला लावून त्याच्यासोबत असलेल्या आणखी 3 जणांसोबत या सापाला खाल्ले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही आश्चर्यकारक घटना तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील आहे. साप मारून खाण्याबद्दल पोलिसांनी 30 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. हा माणूस तेव्हा चर्चेत आला जेव्हा त्याने सोशल मीडियावर साप मारण्याचा आणि खाण्याचा व्हिडिओ अपलोड केला जो खूप व्हायरल झाला.

सुरेश असे या व्यक्तीचे नाव असून तो थांगमपुरीपट्टिनमचा रहिवासी आहे. व्हिडिओमध्ये आणखी 3 लोक त्याच्याबरोबर दिसत आहेत ज्यांनी प्रथम रेट स्नॅक पकडून नंतर मारला. सापाला ठार मारल्यानंतर त्याचे तुकडे केले आणि त्याला मसाला लावून मांसासारखे शिजवले. त्यानंतर चार लोकांनी त्या सापाचे मांस एकत्र खाल्ले.

ही माहिती जेव्हा वनविभागाच्या मेट्टूर रेंजच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे सुरेशला ताब्यात घेतलं. या प्रकरणात हुसेन नावाचा एक 27 वर्षीय व्यक्तीही सापडला जो या गुन्ह्यात सामील आहे. या प्रकरणात के सुरेशला रिमांडसाठी न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले. त्याच्याकडून त्या दोन जणांची माहिती घेतली जात आहे ज्यांची ओळख पटली नाही. लवकरच उर्वरित आरोपीही पकडले जातील, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like