खंडणीच्या गुन्ह्यात २ वर्षापासून फरार असलेला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खंडणीच्या गुन्ह्यात मागील २ वर्षांपासून फरार असलेल्या एकाला खंडणी व अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.

योगेश सुभाष मिसाळ (२६, काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी व अंमली विरोधी पथक पश्चिम विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे हडपसर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीसांच्या अभिलेखावरील अट्टल गुन्हेगार योगेश मिसाळ हा हडपसर येथील गाडीतळ परिसरत येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी पांडुरंग वांजळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याविरोधात शहरातील व पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक निखील पवार, कर्मचारी पांडूरंग वांजळे, अविनाश मराठे, उदय काळभोर, हनुमंत गायकवाड, विजय गुरव, अमोल पिलाणे, सचिन कोकरे, प्रमोद मगर, मंगेश पवार, नारायण बनकर यांच्या पथकाने केली.