महिलेकडून 4000 रूपयाची लाच घेणारा कंत्राटी मीटर वाचक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेकडून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या कंत्राटी मीटर वाचक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज सायंकाळी बालिकाश्रम रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली.

सोमनाथ नामदेव वाघुले (वय 30, कंत्राटी मीटर वाचक, म.रा.वि.व. कंपनी अहमदनगर ) हे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराच्या घराचे लाईट बिल जास्त आले आहे. त्यामुळे, म.रा.वि.वि.कंपनने बसवलेले विद्युत मीटर मध्ये फेरफार करून, मीटर स्लो करून, पुढील महिन्यापासून बिल कमी येईल, अशी सेटिंग करून देण्यासाठी कंत्राटी मीटर वाचकाने लाच मागितली होती.

त्यामुळे सदर महिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. त्यावरून पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य करून पंचासमक्ष साकार हाॅस्पिटलसमोर, बालिकाश्रम रोड येथे स्विकारताना वाघुले यास पकडले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/