तलाठी कार्यालयात लाच घेताना खासगी तरुण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाडेपट्टा कराराची सातबारावर नोंद करण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी तरुणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सोमवारी रात्री वडगाव खुर्द तलाठी कार्यालयात ही कारवाई झाली आहे. पंकज ज्ञानेश्वर पवार (वय ३१, रा. चरवड वस्ती, वडगाव खुर्द) असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे.

यातील तक्रारदाराला वडगाव खुर्द परिसरात भाडेपट्टा कराराची सातबाऱ्यावर नोंद करायची होती. त्यासाठी तलाठी कार्यालयात कार्यरत खासगी तरुणाने तक्रारदाराकडे यांच्याकडे २० हजारांची लाच मागितली. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी रात्री तलाठी कार्यालयात तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पवार याला पकडले.

कारवाई पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Visit : Policenama.com