47 वर्षीय प्रभू देवा दुसऱ्यांदा करणार लग्न ? भाचीला करतोय डेट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    डायरेक्टर, प्रोड्युसर आणि अ‍ॅक्टर प्रभू देवा (Prabhu Deva) पुन्हा एका लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. प्रभू देवा आपल्या भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. वाद झाल्यानंतर तो आपल्या पहिल्या पत्नीपासून वेगळा झाला होता.

एका इंग्रजी वृत्तानुसार, 47 वर्षीय प्रभू देवा आपल्या भाची सोबत लवकरच लग्न करण्याचा बेत आखत आहे. परंतु प्रभू देवा किंवा त्याच्या जवळच्यांनी मात्र याची कोणतीही पुष्टी केलेली नाही.

1995 मध्ये केलं होतं पहिलं लग्न

प्रभू देवानं 1995 साली रामलत (Ramlath) सोबत पहिलं लग्न केलं होतं. रामलत इस्लाम धर्मीय होती. लग्नानंतर तिनं हिंदू धर्म स्वीकारला होता आणि तिनं तिचं नाव बदलून लता ठेवलं होतं.

प्रभू आणि लता यांना 3 मुलं आहेत. 2008 साली मोठा मुलगा विशाल याचं कॅन्सरमुळं निधन झालं होतं. घटस्फोटानंतर मुलांची कस्टडी लताला मिळाली. परंतु प्रभूला त्याच्या मुलांना भेटण्याचं स्वातंत्र्य आहे.

प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सलमान खानचा सिनेमा राधे डायरेक्ट करत आहे. याशिवाय तो तमिळ सिनेमा पोन मनिकावेल, युंग मुंग सुंग आणि बघीरा अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहे.